Breaking
अपघात

सप्तशृंगी गड परिसरात इनोव्हा कार दरीत कोसळली

पिंपळगाव बसवंत च्या सहा भाविकांचा मृत्यू

0 4 2 9 5 7

सप्तश्रृंगी गडाच्या दिशेला जाणाऱ्या घाटावर आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन दर्शन घेऊन परतत असताना एक इनोव्हा कार 600 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील सर्व सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त गाडीचा MH 15 BN 0555 असा नंबर आहे. या गाडीतील सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंतचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कळवण महसूल विभागाकडून घटनेतील मृतकांबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची गाडी क्रमांक MH 15 BN 0555 घाटात भवरी धबधब्याजवळ ओव्हरटेकच्या नादात कठडे तोडून 600 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात पटेल परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अपघातातील सर्वजण हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते.

या घटनेत किर्ती पटेल (वय 50), रशिला पटेल (वय 50), विठ्ठल पटेल (वय 65), लता पटेल (वय 60), पचन पटेल (वय 60), मनी बेन पटेल (वय 70) यांचा मृत्यू झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे