Breaking
निवडब्रेकिंगमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

डॉ. सचिन गायकवाड यांना पीएच.डी. पदवी

0 4 2 9 5 7

डॉ. सचिन गायकवाड यांना पीएच.डी. पदवी — ‘टॅब्लेट-इन-टॅब्लेट’ तंत्रज्ञानाने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

औषधनिर्माण क्षेत्रात अभिनव संशोधन; Heliyon आणि Springer जर्नल्समध्ये लेख प्रकाशित

नाशिक : एम.ई.टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक येथील डॉ. सचिन शिवाजी गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून “Application of ‘Tablet-in-Tablet’ for Resolving the Problem Related to Solid Oral Dosage Form” या विषयावरील संशोधनासाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या या संशोधनात डॉ. गायकवाड यांनी औषधनिर्मिती क्षेत्रात ‘टॅब्लेट-इन-टॅब्लेट’ तंत्रज्ञान विकसित करून औषध वितरणातील परिणामकारकता वाढवली आहे.

या संशोधनातून त्यांनी दोन नवी औषध प्रणाली विकसित केल्या —

१) टिमोलोल मॅलेट टॅब्लेट-इन-टॅब्लेट प्रणाली — उच्च रक्तदाबावरील तत्काळ आणि नियंत्रित उपचारासाठी.

२) ओमेप्राझोल–सोडियम बायकार्बोनेट टॅब्लेट-इन-टॅब्लेट प्रणाली — आम्लनिर्वीकरण आणि औषधसंरक्षणासाठी.

त्यांचे संशोधन Heliyon (Elsevier, UK) आणि Beni-Suef University Journal of Basic and Applied Sciences (Springer, Germany) सारख्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असून “Review on Tablet-in-Tablet Techniques” हा लेख ५०,००० हून अधिक वेळा वाचला गेला आहे.

संशोधन कार्याबद्दल त्यांना “Outstanding Oral Presentation Award” आणि “3rd South Asian Education Award (Research Category)” असे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

पल्या भावना व्यक्त करताना डॉ. गायकवाड म्हणाले, “हा प्रवास शिक्षण, संशोधन आणि आत्मविकासाने भरलेला होता. माझ्या मार्गदर्शकांचे, कुटुंबीयांचे व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे