0
4
2
9
5
7
वाहनांना एच.एस.आर.पी नंबर प्लेट
बसविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
नाशिक, दि.18 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविणे 15 ऑगस्ट 2025 पर्यंत बंधनकारक होते. अद्यापही बऱ्याच वाहनांना एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसविणे बाकी आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार एस.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यत मुदवाढ देण्यात आली असून, जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पुर्वीच्या वाहनांच्या वाहनधारकांनी विहित मुदतीत नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वाहनांना एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी M/s. FTA HSRO solutions pvt. Ltd ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. वाहनधारकांनी http://maharashtrahsrp.com अथवा http://transport.maharashtra. gov.in या संकेतस्थळवार अर्ज करून आपल्या वाहनास HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत न बसविल्यास अशा वाहनांचे मालकी हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे/ उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे इत्यादी वाहन विषयक कामे HSRP नंबर प्लेट बसविल्याशिवाय करण्यात येणार नाहीत. तथापि ज्या वाहन मालकांनी HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी नियोजित वेळ व दिनांक घेतला असल्यास त्याची पावती उपरोक्त कायदपत्रांसोबत जोडल्यास त्यांच्या वाहनांचे पुढील कामकाज करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
00000
0
4
2
9
5
7



