
0
4
2
9
5
7
.विंचूर – येथील पाण्याच्या टाकीखाली (इंदिरानगर) मोकळ्या जागेत पत्त्यावर जुगार खेळत असतांना दोघांना लासलगाव पोलीसांनी ताब्यात घेतले. तसेच जुगारातील रोख रक्कम 740 रूपये आणि प्रत्येकी 35 हजाराच्या दोन अशा 70 हजार रूपयांच्या मोटारसायकली जप्त केल्याची कारवाई लासलगाव पोलीसांनी आज (दि. 10) दुपारी 3 वाजेच्या सुमारास केली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विंचूर येथील इंदिरानगर परिसरात पालखेड कालव्यालगत असलेल्या पाणीपुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीखाली मोकळ्या जागेत सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीसांनी छापा टाकला. यावेळी रामनाथ मोहन पवार (वय 38, रा. विठ्ठलवाडी) व राहुल नंदू पवार (वय 30) हे दोघे पत्त्यावर जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडून 740 रूपये रोख, हिरो एच.एफ.डीलक्स कंपनीची 35000/- रूपपये किमतीची मोटारसायकल व सीटी 100 मोटारसायकल 35000/ रूपये किमतीची असा 70740 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. पोशि सागर आरोटे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुरनं.30/2026 महा.जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुढील तपास सपोनि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धुमाळ व त्यांचे सहकारी करीत आहेत.
0
4
2
9
5
7


