विंचुर येथे माजी विद्यार्थ्यांचा “उत्सव मैत्रीचा” कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न
तब्बल ३८ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
विंचूर – येथे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील, एसएससी १९८६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी- विद्यार्थीनीं आणि शिक्षक यांचा ‘उत्सव मैत्रीचा’ या स्नेहसंमेलन कार्यक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
आज या ‘उत्सव मैत्रीचा’ कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांमध्ये सुनील क्षिरसागर, गणेश साळी, वसंत गायकवाड, भैया कर्पे, राजेंद्र पुंड, विजय पुंड, शरद गायकवाड, मधुकर राऊत, नंदू मंडलिक, शरद मंडलिक, वसंत वाघ, दत्ता नागमोते, संतोष साळी, साहेबराव जेऊघाले, अलका बोराडे, लक्ष्मण मोरे, नामदेव क्षिरसागर, रमेश ढवण, उत्तम आव्हाड, शैलेश कचोळे, रमेश सालगुडे, लहानु गावडे, प्रभा कापसे, उज्वला बोराडे, जया पोद्दार, संजय ठुबे, अनिल कल्याणकर, श्याम बोरसे, रत्नाकर दरेकर, राजू कानडे, जनाबाई धाकराव हे साधारण ४० ते ४५ माजी विद्यार्थी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले निवृत्त शिक्षक एकत्र येऊन पुन्हा एकदा महाविद्यालयीन जीवनाचा अनुभव घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या उत्सव मैत्रीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष १९८६ सालचे सुपरवायझर सोनवणे आप्पा (सर) यांना देण्यात आले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमात काही क्षण असे भाऊ करून गेले सर्वांना की, ‘मुसाफिर तो यारो ना घर है ना ठिकाना बस चलते जाना..’ अश्या जुन्या गाण्यांच्या धुनवर या मैफिलित श्याम बोरसे यांनी अगदी सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. तर त्याचबरोबर उज्वला शिरसाट, अनिल कल्याणकर यांनी सुद्धा आपल्या गाण्यातून सर्वांना भाऊक करून टाकले होते. ‘चिठ्ठी आयी है ..चिट्ठी आयी है वतन की..’ या गाण्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तळले होते.
तसेच या शाळेत शिक्षकांसह काही माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात या उत्सव मैत्रीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनवणे आप्पा सर यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदाऱ्या बद्दल अगदी मौलिक विचार मांडले सुना, मुल, जावई, नातवंड या सर्वांविषयी तुम्ही कसे संस्कार कराल आणि करा याबद्दल..
सी टी जाधव (सर) सांगतात, मी ज्यावेळी शाळेत कार्यरत होतो. फक्त शिक्षक म्हणूनच राहिलो नाही. मुलांना बस मध्ये बसून देईपर्यंत बस स्टैंड वर त्यांच्यासोबत जात असे. ज्या काही मुलांना शाळेत व्यतिरिक्त अडचणी येत होत्या त्या मी माझ्या परीने मदत सुट्टीच्या दिवशी सुद्धा करीत असे..
बागुल (सर) सांगतात हे गेट-टुगेदर का घ्यावा याच्यातून तुमच्या पुढील आयुष्यात काय फायदा होईल तुमच्या या नव्याने ओळख झाल्याने, प्रत्येक क्षेत्रात तुमचे मित्र कार्यरत आहे. त्यांचा फायदा या जीवनात तुमच्या मुलांना आणि तुम्हाला नक्कीच देऊन जाईल याविषयी त्यांनी छान असे विश्लेषण केले.
तसेच भाऊसाहेब म्हसकर, साहेबराव जेऊघाले, शैलेश कचोळे, अनिल कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातुन जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांना भाऊक केले होते. सर्वांचे मन अगदी भरून आले होते. तर भाऊसाहेब म्हसकर यांनी गेट-टुगेदर का सुरू झाले, याचा फायदा काय, याबद्दल अगदी छान अशी माहिती सांगितली आणि जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सद्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य देवढे सर यांनी आपल्या मनोगतातून या स्नेहसंमेलनात आलेले माजी विद्यार्थ्यांकडून फुल नाही फुलाची पाकळी शाळेला अपूर्ण असलेल्या कामांमध्ये योगदान द्यावे त्यांच्या या मागणीवरून सर्व माजी विद्यार्थ्यांनी विचारविनिमय करून काहीतरी शाळेला योगदान करण्याचे ठरवले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहानु गावडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शैलेश कचोळे यांनी केले आणि या कार्यक्रमाला रंगत आणत सूत्रसंचालन भाऊसाहेब म्हसकर यांनी केले.