0
4
2
9
5
7
विंचूर येथील मारवाडी पेठेत राहत असलेले कांदा व धान्य व्यापारी पवन नंदूलाल जाजू ( वय 50 ) यांच्यावर त्यांच्या व्यवसायात भागीदार असलेले मनोज म्हसू गोराडे यांनी धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी घडली. या प्रकरणी मनोज गोराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पवन जाजू यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर व्यापारी असोसिएशन तर्फे सोमवार दिनांक 6 रोजी विंचूर बंदची हाक देण्यात आलेले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की पवन जाजू हे आपल्या घरासमोर असताना संशयित आरोपी मनोज गोराडे तेथे आले. या दोघांमध्ये बोलणी सुरू असताना गोराडे यांनी अचानक जाजू यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यामुळे पवन जाजू हे जखमी झाले व ते जमिनीवर पडले. तर आरोपीने तेथून आपल्या स्कुटीवर पळ काढला. तेथील ग्रामस्थांनी जाजू यांना ताबडतोब लासलगाव येथे उपचारासाठी नेले. मात्र या हल्ल्यात जाजू हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीस अटक केली आहे. घटनेमुळे विंचूर गावात एकच खळबळ उडाली आहे.
कारण दोघेही गावातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत.
0
4
2
9
5
7
