गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक
नाशिक पोलिसांची यशस्वी कारवाई: बनावट टाटा मोटर्स डीईएफ युरिया बकेट्स आणि पॅकिंग साहित्य जप्त
0
4
2
9
5
7
नाशिक पोलिसांची यशस्वी कारवाई: बनावट टाटा मोटर्स डीईएफ युरिया बकेट्स आणि पॅकिंग साहित्य जप्त
टाटा मोटर्सच्या अधिकृत टीमकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे नाशिक पोलिसांनी पिंपळगाव परिसरात धाड टाकली. नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. बालासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार पिंपळगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या धाडीत पोलिसांनी बनावट टाटा मोटर्स डीईएफ युरिया बकेट्स आणि पॅकिंग साहित्य जप्त केले.
श्री शैनेश्वर एंटरप्रायझेसचे मालक करण आणि निसार रफिक इनामदार (वय ३०) यांना बनावट टाटा मोटर्स डीईएफ युरिया बकेट्स विक्री केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ०३०६/२०२५ अंतर्गत कलम ५१ आणि ६३, कॉपीराइट कायदा १९५७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
0
4
2
9
5
7



