ब्रेकिंग
नीव्ह फाउंडेशनने सहा राज्यांमध्ये समर रीलीफ मोहिम ‘इस गर्मी, फर्क नजर आयेगा’ सुरू केली

0
4
6
8
5
8
नीव्ह फाउंडेशनने सहा राज्यांमध्ये समर रीलीफ मोहिम ‘इस गर्मी, फर्क नजर आयेगा’ सुरू केली
भारताच्या बहुतांश भागांमध्ये तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असताना नीव्ह फाउंडेशनने (NEEV FOUNDATION) या हंगामातील तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असलेले मैदानी भागातील कामगार, सामान्य जनता, भटके प्राणी आणि पक्षी यांना दिलासा देण्यासाठी ‘इस गर्मी, फर्क नजर आयेगा’ ही मोठ्या प्रमाणावरील समर रीलीफ मोहिम सुरू केली आहे. हा उपक्रम राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र या ६ राज्यांमध्ये राबवला जात आहे.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत वंडर सिमेंटचे संचालक आणि नीव्ह फाउंडेशनचे संस्थापक श्री. विवेक पटनी म्हणाले, “भारतात उन्हाळा बहुतांश वेळ घराबाहेर घालवावा लागणाऱ्या व्यक्तींसाठी दिवसेंदिवस अत्यंत कठीण होत चालला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून, आम्हाला अशा व्यक्तींसाठी त्वरित आणि सहज उपलब्ध होईल अशी मदत निर्माण करायची होती, जे अत्यंत प्रतिकूल हवामानातही आपली शहरे सुरळीत ठेवण्यासाठी काम करत असतात. कधी-कधी सर्वात अर्थपूर्ण मदत अत्यंत सोपी देखील असते; मग ते एक ग्लास पाणी देणे असो, सावलीमध्ये आराम करण्याचा क्षण देणे असो किंवा कठीण परिस्थितीत मुलभूत आधार देणे असो.”
ते पुढे म्हणाले, “नीव्ह फाउंडेशनची स्थापना व्यक्तींना मदतीची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा त्यांच्यासाठी धावून जाणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, या विश्वासावर झाली आहे. आम्हाला आशा आहे की, ही मोहिम नागरिकांनाही काळजीपोटी लहान लहान पावले उचलण्यास प्रोत्साहित करेल, जसे पक्षी आणि भटक्या प्राण्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवणे, किंवा उन्हाच्या तीव्रतेच्या काळात डिलिव्हरी बॉईज आणि मैदानी कामगारांना मदत करणे. सामूहिक कृतीची सुरुवात अनेकदा वैयक्तिक जागरूकतेतून होते. कधी-कधी, एका लहानशा सुरुवातीमुळे मोठा बदल घडून येतो आणि एका क्रांतीची सुरुवात होते.”
नीव्ह फाउंडेशन अधिक वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी आणि थेट उन्हात दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत, ज्यामध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्स, बांधकाम कामगार, फेरीवाले आणि ऑटोरिक्षा चालक यांचा समावेश आहे, स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी ६० मदत व्हॅन्स तैनात करत आहे. पाण्यासोबत, या व्हॅन्सच्या माध्यमातून ओआरएस पाकिटे आणि संरक्षणात्मक टोप्यांचे वाटप केले जाईल, ज्यामुळे उष्णतेच्या त्रासापासून बचाव होईल आणि अति घामामुळे शरीरातील कमी झालेले क्षार पुन्हा भरून निघण्यास मदत होईल.
हा उन्हाळ्याचा संकटकाळ फक्त मानवी कल्याणापुरता मर्यादित नाही, हे लक्षात घेऊन फाउंडेशनने भटक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत, तसेच अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी खाण्याची भांडी आणि पाण्याचे ट्रे ठेवले आहेत. ही मोहिम उपलब्धता आणि सहानुभूती या साध्या संकल्पनेवर आधारित आहे. फाउंडेशनने याचे वर्णन करताना म्हटले आहे की: “तहानलेला नेहमी विहिरीकडे जातो. पण या उन्हाळ्यात, आम्ही ती विहीरच तहानलेल्यांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
या मोहिमेमागे जनतेला जागरूक आणि संघटित करण्याचा एक निश्चित उद्देश आहे. वाढते तापमान हे शहरी आणि ग्रामीण भारतासमोर एक निरंतर आव्हान असताना उन्हाळ्याच्या त्रासापासून दिलासा देण्याच्या या कार्यात सामुदायिक सहभाग अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जात आहे.
हा हंगामी प्रयत्न व्यापक विकास उद्दिष्टाचा भाग आहे. निंबाहेडा येथील नीव्ह फाउंडेशनचे रुरल डेव्हलपमेंट सेंटर (ग्रामीण विकास केंद्र) त्यांच्या दीर्घकालीन कार्याचा मुख्य आधारस्तंभ आहे. यामध्ये ‘हुनर’ उपक्रमांतर्गत महिलांचे कौशल्य विकास, ‘संरचना’ अंतर्गत सामुदायिक पायाभूत सुविधा, ‘उडान’ अंतर्गत शैक्षणिक मदत, ‘आरोग्यम’ अंतर्गत आरोग्य सेवा आणि ‘इको ग्रीन’ अंतर्गत शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जातात.
‘इस गर्मी, फर्क नजर आयेगा’ या मोहिमेद्वारे फाउंडेशनने एका साध्या, पण संकटकाळात अनेकदा दुर्लक्षित होणाऱ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे, ती म्हणजे योग्य दिशेने आणि मोठ्या प्रमाणावर दाखवलेली सहानुभूती अलिकडच्या वर्षांतील भारताच्या सर्वात कठीण उन्हाळ्याचा सामना करणाऱ्या गरजू व्यक्तींना प्रत्यक्ष आणि ठोस दिलासा देऊ शकते.
0
4
6
8
5
8


