Breaking
सत्कार

अश्विनी नवलेची महिला व बालकल्याण मध्ये परिविक्षा अधिकारी पदाला गवसणी

0 3 2 1 0 5

अश्विनी नवलेची महिला व बालकल्याण मध्ये परिविक्षा अधिकारी पदाला गवसणी

विंचूर – येथील अश्विनी सुनिता किरण नवले हिने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रोबेशन अधिकारी पदाला गवसणी घातली. अश्विनीने येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेऊन गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी खुर्द पुणे येथे बी.ई. ई.अँड टी.सी. ही पदवी मिळवली होती.परंतू बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न बघत असलेल्या अश्विनीने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास आयुक्तालय पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या परिविक्षा अधिकारी (प्रोबेशन ऑफीसर)पदाची परीक्षा दिली.अश्विनीने या परिक्षेत २०० पैकी १९२.४५ गुण मिळवत महाराष्ट्रात दुसरा तर मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

अश्विनीच्या यशाचे नाशिक लोकसभेचे माजी खासदार समीर भुजबळ, विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, माजी सरपंच अविनाश दुसाने, निफाड पं.स.चे माजी सभापती विलास गोरे, पांडुरंग राऊत, डॉ शैलेश काळे, दिलीप कोथमिरे, प्रविण ढवण, राजेंद्र भारती, इस्माईल मोमीन, विंचूर प्रेस क्लबचे अध्यक्ष डी.बी. काद्री, उपाध्यक्ष जगन्नाथ जोशी, पत्रकार किशोर पाटील, प्रकाश जाजू, दैनिक आवाज चे सहसंपादक भाऊसाहेब हुजबंद, संदीप शिरसाट, नितीन गायकवाड, दिपक घायाळ, आरिफ मोमीन,परेश बाहेती, प्रतिभा बाहेती आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कु.अश्विनी सुनीता किरण नवले हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महिला बाल विकास अधिकारी या पदी राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाने निवड झाली. त्याबद्दल नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी कु.अश्विनी हिचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत भावी उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अश्विनी चे वडील किरण नवले, विलास गोरे, पांडुरंग राऊत, मोहसीन शेख, अनिल विंचूरकर,ओम राऊत, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे