Breaking
क्रिडा व मनोरंजन

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न

‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत नवीन धमाल चित्रपट

0 4 4 0 8 3

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न

‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत नवीन धमाल चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या विषयांची आणि फ्रेश कंटेंटची लाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने आता प्रेक्षकांसाठी मैत्री, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा तरुणाईच्या जवळचा विषय घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या नावावरूनच गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधली मोकळीक यांचा भन्नाट मेळ यात अनुभवायला मिळणार, याची चाहूल लागते. फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, तरुण प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाची नेमकी कथा आणि कलाकारांची फळी अद्याप गुप्त ठेवण्यात आली असली तरी, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हे शीर्षकच प्रेक्षकांना आपल्या मित्रांच्या ग्रुपची आठवण करून देणारं आहे.

दिग्दर्शक विजू माने सांगतात, “‘स्ट्रगलर साला’ला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम माझ्यासाठी खूप खास आहे. त्या सीरिजमधील मैत्री आणि मस्ती लोकांच्या मनाला भिडली. त्याच भावनेतून ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ही कल्पना आकाराला आली. या चित्रपटातून प्रेक्षकांना मनमुराद हसण्याचा, मित्रांसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करून देणारा आणि थोडासा नॉस्टॅल्जिक अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक मित्रांच्या ग्रुपमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन केला जातो आणि तो फसतो, अशाच मित्रांची ही कहाणी आहे. हलक्याफुलक्या शैलीत सांगितलेली ही कथा प्रत्येकाला आपलीशी वाटेल.”

विजुमेनिया प्रायव्हेट (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, विजू माने लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मैत्रीचा रंगतदार जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

गोव्याच्या पार्श्वभूमीवर रंगणारी ही धमाल सफर प्रेक्षकांना केवळ हसवणारच नाही, तर आपल्या मित्रांसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देणार, एवढं मात्र नक्की!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे