Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

येवल्यात साकारणार राष्ट्रीय दर्जाची कुस्ती प्रशिक्षण अकादमी

0 4 2 9 5 7

येवला, दि.२७ नोव्हेंबर:- येवला शहरामध्ये राष्ट्रीय दर्जाची कुस्ती प्रशिक्षण अकादमी साकारण्यात येणार आहे. महायुतीच्या वचननाम्यामध्ये तसे नमूद करण्यात आले आहे. येवला शहरात कुस्तीची मोठी पंरपरा आहे. या अकादमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक तसेच माती व मॅटवरील कुस्तीच्या अत्याधुनिक सुविधाही मिळणार आहेत.

येवल्यामध्ये कुस्तीची मोठी परंपरा आहे. आजही येथे कुस्तीचे आखाडे रंगतात. शहरात अनेक वर्षांपासून कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात. दरवर्षी श्रावण महिन्यात भव्य कुस्तीचा आखाडा भरतो. यात अनेक नामवंत पैलवान सहभाग घेतात. येवला हे कुस्तीचे एक केंद्र बनले आहे, जिथे स्थानिक संस्कृती आणि परंपरेचा एक भाग म्हणून कुस्तीला विशेष महत्त्व दिले जाते. ‘धडपड मंच’ सारख्या संस्था येवल्यात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करतात, ज्यामुळे या परंपरेला प्रोत्साहन मिळते.
येवल्यातील मल्ल जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. धोंडीराम वस्ताद तालीम संघ आणि कुस्ती मल्लविद्या यासारख्या संस्थांमधून कुस्तीला प्रोत्साहन दिले जाते. ज्यामुळे स्थानिक मल्ल विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशाचे शिखर गाठत आहेत. येवला तालुक्यातील अनेक खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

येवल्याच्या रोहन राजेंद्र लोणारी आणि वैभव लोंढे यांनी छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार पैलवान
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, रिपाइं आणि घटक पक्षांच्या महायुतीने राजेंद्र भाऊलाल लोणारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. लोणारी हे नामवंत पैलवान असून उपमहाराष्ट्र केसरी आहेत. शिवाय ते मितभाषी आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणार आहेत. लोणारी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वातच येवल्यामध्ये राष्ट्रीय कुस्ती अकादमी साकारली जाईल, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

येवल्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. ती जोपासतानाच त्यात वाढ व्हावी, पैलवानांना उत्तम सुविधा आणि योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय दर्जाची कुस्ती अकादमी स्थापन केली जाईल. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने येवला पैठणी उद्योगाची भरभराट करण्यात आली त्याच पद्धतीने आता कुस्ती क्षेत्राचाही कायापालट केला जाणार आहे. या अकादमीमुळे येवल्यातील मल्ल ऑलिम्पिक पर्यंत पोहचून देशाचे नाव रोशन करतील, अशी आम्हाला खात्री आहे.
– समीर भुजबळ, माजी खासदार

महाराष्ट्रातील कुस्तीचे पारंपरिक प्रकार
तांबड्या मातीतील कुस्ती – महाराष्ट्रात हा पारंपरिक प्रकार प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक पारंपरिक डावपेच वापरले जातात, जसे की कलाजंग, ढाक, मोळी, निकाल इत्यादी.
पैलवानी – भारतात अनेक ठिकाणी या पारंपरिक प्रकाराला पैलवानी म्हणतात. यात शारीरिक ताकद आणि कौशल्याचा वापर केला जातो.
भीमसेनी कुस्ती – या कुस्ती प्रकारात शारीरिक ताकदीला जास्त महत्त्व दिले जाते.
हनुमंती कुस्ती – या प्रकारात ताकदीसोबतच डावपेच आणि कलेला अधिक महत्त्व दिले जाते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे