चला सांगोला वारकरी संमेलनास – आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर

चला सांगोला वारकरी संमेलनास- आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर
नाशिक: अखिल भाविक वारकरी मंडळाचे माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष हभपश्री गुरुवर्य सुधाकर जी महाराज इंगळे यांचे कुशल मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, अंबिका मंदिर चौक तहसील कार्यालयाजवळ सांगोला जिल्हा सोलापूर येथे भव्य दिव्य असे राज्य व्यापी एक दिवशीय वारकरी संमेलन दि.९मार्च रोजी स.९ ते सायं ५ वाजेपर्यंत संपन्न होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष हभप श्रीगुरु माधवजी महाराज नामदास पंढरपूर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी संस्थानचे विश्वस्त हभपश्री निरंजनदास योगीजी महाराज भुषवणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून वासकर फडाचे हभपश्री गोपाळ आण्णा वासकर महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप श्रीगुरु सुधाकरजी महाराज ईंगळे सोलापूर, राष्ट्रीय उपाध्यक्ष हभपश्री भागवत महाराज चवरे पंढरपूर, आध्यात्मिक आघाडीचे हभपश्री अक्षय महाराज भोसले, भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष हभपश्री आचार्य तुषार महाराज भोसले,सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री समाधान दादा औताडे, विधान परिषदेचे मा.आमदार श्री दिपक साळुंके पाटील, मा.आमदार श्री शहाजी बापु पाटील, जेष्ठ संपादक मा.श्री राजा माने,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री चेतनसिंग सावंत,सांगोला नगर परिषद मुख्याधिकारी मा.श्री सुधीर गवळी, सांगोला तहसीलदार मा.श्री संतोष कणसे,सांगोला पोलिस निरीक्षक मा.श्री भिमराव खणदाळे, अ.भा.वारकरी मंडळ प्रदेशाध्यक्ष हभपश्री जोतिराव महाराज चांगभले, वारकरी मंडळ जिल्हाध्यक्ष सोलापूर हभपश्री ज्ञानेश्वर माऊली भगरे,सह जिल्हाध्यक्ष हभपश्री बिरा बंडगर महाराज आदी उपस्थित राहणार आहेत, तरी संमेलनासाठी नाशिक जिल्हा भरातून वारकरी भाविकांनी आवश्य यावे असे आवाहन हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर जिल्हाध्यक्ष अ.भा.वारकरी मंडळ नाशिक यांनी केले आहे, इच्छुकांनी ९३०९८७४१६४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे सचिव हभपश्री साहेबराव महाराज अनवट यांनी सांगितले.सांगोला पंढरपूर पासून तीस कि.मी.अंतरावर आहे. भाविकांना पंढरपूर दर्शनही येता जातांना सहज घेता येईल असे जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री विलास महाराज सांगळे सिडको यांनी म्हटले आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्र व बाहेरील ही वारकरी, भाविक महिला वारकरी ही बहुसंख्येने उपस्थित राहाणार आहेत अशी माहीत वारकरी मंडळ नाशिक जिल्हा सदस्य हभपश्री उध्दव महाराज बिराजदार कर्नाटककर यांनी शेवटी सांगितले.तरी दि.८ मार्च शनिवारी सकाळी १० वा.मुंगसरे येथे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राजाराम पा.फडोळ यांचे शुभहस्ते व श्रीहभप रावसाहेब महाराज लोणारे, हभपश्री एकनाथ महाराज भोर,सभापती मा.श्री विष्णुपंत म्हैसधुने सो., हभपश्री हिरामण महाराज म्हैसधुने, हभपश्री दत्तात्रय फडोळ, वारकरी मंडळ तालुका अध्यक्ष हभपश्री दिनकर महाराज खांडबहाले, संपर्क प्रमुख हभपश्री शिवाजी महाराज खांडबहाले, हभपश्री निवृत्ती महाराज कापसे, हभपश्री रामनाथ महाराज धोंडगे यांचे अध्यक्षतेखाली हभपश्री विठ्ठल महाराज जाधव वैजापूरकर विशेष अतिथी यांचे उपस्थीतीत वारकरी फलक अनावरण करुन नाशिक जिल्हा वारकरी भाविक पंढरपूर कडे रवाना होणार आहे अशी माहीती जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री भरत महाराज वाघ शिवडा यांनी दिली आहे.