ब्रेकिंग
लासलगाव येथील दिगंबर जैन मंदिरात भंडारा पेटी फोडली
0
4
8
5
2
0
लासलगाव येथील दिगंबर जैन मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी मंदिराची भिंत तोडून आत प्रवेश मूर्ती चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्री २ वाजेच्या सुमारास मंदिराची भिंत फोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातील देवांची मूर्ती, मौल्यवान चांदीची छत्रे आणि मंदिरातील भंडारा पेटी फोडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील करत आहेत.
~Pandit Sir+91 99238 33792
0
4
8
5
2
0

