Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

डीजे वाजवणे पडले महागात,; दंडासह आठ दिवसाची शिक्षा

0 3 2 9 4 9

शांतता झोन मध्ये कर्णकर्कश व मोठया आवाजात DJ वाजून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आरोपीस न्यायालयाकडून शिक्षा* 

निफाङ प्रतिनिधी- 

दिनांक 18/06/2025 रोजी सकाळी सुमारे 11:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, निफाड येथे MH 06 AQ 9096 क्रमांकाचे आयशर 407 वाहन बेकायदेशीररित्या मोठ्या व कर्णकरकश आवाजात DJ वाजवत असल्याची निफाड न्यायालयात लक्षात आल्याने कामात व्यत्यय येत असल्याने कोर्ट ड्युटीवर असलेल्या पोलीस नाईक कल्पना पवार यांनि 

त्यानुसार त्यांनी तत्काळ पो.हवा. खुळे, पो.कॉ. चकोर, पो.कॉ. सूर्यवंशी, पो.ना. सांगळे यांच्यासह घटनास्थळी जाऊन संबंधित वाहन रोखले. वाहन चालकाने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून DJ मोठ्या आवाजात वाजवत राहिला. चौकशीत त्याचे नाव योगेश ज्ञानेश्वर वारुळे, वय 31, रा. खडक, माळेगाव, ता. निफाड असे सांगितले. त्याच्याकडे DJ वाजवण्यास कोणतीही वैध परवानगी नव्हती. त्याने बेकायदेशीररित्या DJ वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केला.

    सदर प्रकरणी निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून, आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयीन निर्णय (दिनांक 19/06/2025):

माननीय न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, निफाड (मा. शुभदा एस. सुकरे) यांनी दोषी आरोपीस खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

₹1000/- (एक हजार रुपये) दंड,व 8 दिवसांची साधी कैद शिक्षा सूनावण्यात आली आहे

सदर गुन्हा भारतीय न्यायसंहिता कलम 292, 38, 136, 33(1)(d), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 131, व मोटार वाहन कायदा कलम 119/177 अंतर्गत नोंदवण्यात आला होता.

पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करते की, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डीजे किंवा मोठ्या आवाजात स्पीकर वापरण्या अगोदर शासनाची परवानगी घ्यावी, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे