Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

मेंदुज्वर एका दिवसात ठरू शकतो जीवघेणा; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

जागतिक मेंदुज्वर दिनानिमित्त न्यूरोफिजिशियनचे आवाहन; वेळेवर निदान आणि उपचारांचे महत्त्व अधोरेखित

0 5 1 7 3 0

मेंदुज्वर एका दिवसात ठरू शकतो जीवघेणा; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

जागतिक मेंदुज्वर दिनानिमित्त न्यूरोफिजिशियनचे आवाहन; वेळेवर निदान आणि उपचारांचे महत्त्व अधोरेखित

नाशिक, ५ ऑक्टोबर २०२६ : तापासोबत तीव्र डोकेदुखी, मान आखडणे, वारंवार उलट्या होणे किंवा गोंधळाची अवस्था जाणवणे ही मेंदुज्वराची लक्षणे असू शकतात. अनेकदा ही लक्षणे साधा विषाणूजन्य ताप समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र मेंदुज्वराच्या बाबतीत उपचारासाठी मिळणारा वेळ अत्यंत मर्यादित असतो.

मेंदुज्वराच्या बाबतीत उपचारासाठी उपलब्ध वेळ दिवसांत नव्हे, तर तासांमध्ये मोजला जातो, मेंदुज्वर हा गंभीर आणि जीवघेणा प्रकार आहे. या आजाराच्या रुग्णांपैकी सुमारे सहापैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो, तर वाचलेल्या प्रत्येक पाचपैकी एका रुग्णाला गंभीर गुंतागुंत होऊ शकते. क्षयरोग (TB) हा दीर्घकाळ टिकणाऱ्या मेंदुज्वराच्या प्रमुख कारणांपैकी एक असून, भारतात त्याचे प्रमाण विशेषतः महत्त्वाचे आहे.

जगभरात दरवर्षी सुमारे २५ लाख लोकांना मेंदुज्वर होतो, त्यामुळे लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे, असे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जागतिक मेंदुज्वर दिनानिमित्त सांगितले. मेंदुज्वरामध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे उपचाराला होणारा विलंब,” “अनेक कुटुंबे घरी तापाचे औषध देऊन परिस्थिती सुधारते का याची वाट पाहतात. मात्र मान आखडणे, गोंधळाची अवस्था किंवा मूल असामान्यपणे सुस्त होणे अथवा दूध न घेणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या आपत्कालीन विभागात घेऊन जा.” मेंदुज्वर म्हणजे मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असलेल्या संरक्षणात्मक आवरणाला आलेली सूज. हा आजार प्रामुख्याने जीवाणू आणि विषाणूंमुळे होतो. जीवाणूजन्य मेंदुज्वर गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो. उपचारानंतरही काही रुग्णांमध्ये ऐकण्याची क्षमता कमी होणे, झटके येणे, अशक्तपणा तसेच स्मरणशक्ती किंवा दृष्टीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

न्यूरोफिजिशियन डॉ. विशाल सावळे, डॉ. प्राची पवार आणि डॉ. अभिजित गढवे यांनी सांगितले की, मेंदुज्वराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाची प्रकृती वेगाने खालावू शकते. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत होते. विशेषतः लहान मुलांमध्ये दिसणारी असामान्य सुस्ती, सतत चिडचिड किंवा दूध न पिणे यांसारखी लक्षणे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. जीवाणूजन्य मेंदुज्वराचा संशय असल्यास तपासणीचे अहवाल येण्यापूर्वीच उपचार सुरू करणे महत्त्वाचे ठरते.

मेंदुज्वराचे निदान करण्यासाठी पाठीच्या कण्यातून द्रवाचा नमुना घेऊन तपासणी केली जाते. जीवाणूजन्य मेंदुज्वराचा संशय असल्यास तपासणीचे निकाल येण्यापूर्वीच प्रतिजैविक उपचार सुरू करणे आवश्यक असते. त्यामुळे उपचाराला होणारा विलंब टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लसीकरण हा मेंदुज्वराच्या काही गंभीर प्रकारांपासून बचाव करण्याचा प्रभावी उपाय आहे. भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या पेंटाव्हॅलेंट आणि न्यूमोकोकल लसींद्वारे संबंधित संसर्गांपासून संरक्षण मिळते. त्यामुळे मुलांचे सर्व नियोजित लसीकरण वेळेवर पूर्ण करावे, तसेच आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मेंदुज्वराच्या बाबतीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. लक्षणे ओळखा, दुर्लक्ष करू नका आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्या, असे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या न्यूरोफिजिशियननी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे