विश्वविक्रमी निष्ठेच्या पायरीचे प्रचंड उत्साहात अनावरण*

छत्रपती सेना शिवजन्मोत्सव
*विश्वविक्रमी निष्ठेच्या पायरीचे अनावरण*
किरण घायदार, नाशिक/प्रतिनिधी
छत्रपती सेनेचा आठवा विश्वविक्रम,” निष्ठेची पायरी” चा अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतिर्थ जिल्हा न्यायालय समोर नाशिक येथे झाला.
नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितिन ठाकरे, स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती ज्यांनी केली,त्यांचे १४ वे वंशज आदरणीय संतोषजी इंदुलकर यांच्या हस्ते विश्वविक्रमाचे अनावरण केले. याप्रसंगी ॲड. नितिन ठाकरे यांनी छत्रपती सेनेच्या आठ विश्वविक्रमाचे आणि छत्रपती सेनेच्या कार्याचे कौतुक केले. विशेषता शालेय विद्यार्थ्यांमधे शिवविचार रुजवण्याची कल्पना ठाकरेसाहेबांनी अधोरेखित केली. विशेष अतिथि आदरणिय संतोषजी इंदुलकर यांनी छत्रपती सेनेच्या कार्याचे कौतुक करतांना सांगितले की, छत्रपती सेनेने संपूर्ण महाराष्ट्रामधे एक आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवरायांच्या सरदारांचा व मावळ्यांचा सन्मान छत्रपती सेनेने केला. तसेच महिलांसाठी शिवजन्मोत्सवाचे द्वार फक्त छत्रपती सेनेने उघडले. याप्रसंगी आदर्श माध्यमिक विद्यालय नाशिक येथील विद्यार्थी व सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित होते. आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना, पोवाडे सादर केले. लंडन बुक आफ वर्ल्ड रिकॉर्ड च्या ॲमी छेडा यांनी रितसर नोंद करून छत्रपती सेना व प्रमुख अतिथि यांच्याकडे विश्वविक्रमाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. सूत्रसंचालन प्रा विश्वदिप शिंदे आणि प्रगती देवरे यांनी केले,याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा व आदर्श माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक, शिक्षक, यांचा सन्मान छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, मार्गदर्शक निलेश शेलार, कोअर टिम अध्यक्ष डॉ. जयेंद्र थविल, प्रदेशाध्यक्ष राजेश पवार, शिक्षक आघाडी प्रदेशप्रमुख सुनील देशमुख,शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षा शिल्पाताई सोनार, सर्व आघाड्यांचे प्रमुख, पदाधिकारी व छत्रपती सैनिक यांच्या हस्ते करण्यात आले.