Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

निरोगी आरोग्यासाठी योगाभ्यास दैनंदिन जीवनाचा भाग बनवा : डॉ. चारूदत्त शिंदे

जिल्हा रूग्णालयात योगदिन उत्साहात साजरा

0 1 5 1 2 0

नाशिक, दिनांक 21 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): उत्तम आरोग्य असणे ही यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली असून निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी योगाभ्यास दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी केले. आज जिल्हा रूग्णालयात आयुष विभागातर्फे बाह्यरूग्ण विभागात दहावा योगदिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. शिंदे बोलत होते.

आज योगदिनामित्त योगाभ्यास स्वत:साठी व समाजासाठी या संकल्पनेवार आधारित विविध योगविषयक कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निले-श पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. संदिप सुर्यवंशी, डॉ.बाळू पाटील, रूग्णालय अधिसेविका अनिता भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. अनंत गायकवाड, डॉ. प्रवीण बोरा, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) डॉ. सागर काटे, शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्य श्री. सागर अपस्मार, श्रीमती गोंधळी व श्रीमती साबळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज जीवनशैलीशी निगडित आजार आणि योगशास्त्राच्या पद्धतीने संयुक्तिक उपाययोजना, महिला व त्यांचे आरोग्य समस्यांसाठी योगाभ्यासाचे महत्व या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांकडून सामुदायिक योग शिष्टाचार (कॉमन योग प्रोटोकॉल) यांचे प्रात्यक्षिकेही करून घेण्यात आली. योगवर्गाची सुरूवात सामुदायिक योग प्रार्थनेने करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागे सामान्य नागरिकांना योग शास्त्राविषयी व्यापक माहिती मिळावी व योगाभ्यास हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा या प्रमुख उद्देशाने आयुष विभागाच्या योग शिक्षिका डॉ. सुलक्षणा बैरागी व उद्धव हंडोरे यांनी योग वर्ग घेतला. या प्रसंगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व कर्मचारी यांनी योग वर्गात सहभाग नोंदविला.

यावेळी सादर करण्यात आलेले नृत्ययोग, योग आसनांने व काढलेल्या रांगाळी यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.निलेश पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन कविता पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. दिपा माळवे, डॉ.निलेश पाटील, डॉ. सना शेख, डॉ. हिना खान, रिंकु पाटील, जोत्स्ना निकम, किसन डूलगज व उल्हास पैठणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
0000000

मागसवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक, दिनांक 21 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहांत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 10 वी चा निकाल लागल्यापासून वसतिगृहातील रिक्त जागांकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुककांनी प्रवेश अर्ज हे सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ नाशिक-पुणे रोड नाशिक परिसरातील गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह येथून प्राप्त करून 15 जुलै 2024 पर्यंत भरेलेले परिपूर्ण अर्ज मागसवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 4 येथे जमा करावयाचे आहे. सर्व मागासवर्गीय विद्यार्थींनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह (जुने) चे गृहपाल एस.बी गवारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वसतिगृह प्रवेशासाठी अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रत, रहिवाशी दाखला, बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड / शैक्षणिक शुल्क भरणा पावती, गॅप सर्टिफिकेट (गॅप असल्यास) व रेशन कार्ड प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ही मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक ४, गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) नाशिक या तीनही वसतिगृहातील रिक्त झालेल्या जागांसाठी आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी रिक्त जागा…
• मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक ४
अनुसूचित जाती 5 जागा, मातंग 7 जागा, मेहत्तर 12 जागा, अनुसूचित जाती 3 जागा, वि.जा.भ.ज. 4 जागा, इ.मा.व. 1 जागा, वि.मा.प्र 4 जागा, दिव्यांग 3 जागा, अनाथ 3 जागा व खासबाब 8 जागा अशा एकूण 34 जागा

•गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक
अनुसूचित जाती 30 जागा, मातंग 5 जागा, मेहत्तर 6 जागा , अनुसूचित जाती 3 जागा, वि.जा.भ.ज. 2 जागा, इ.मा.व. 4 जागा, वि.मा.प्र 2 जागा, दिव्यांग 2 जागा व अनाथ 2 जागा अशा एकूण 56 जागा

•गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) नाशिक
अनुसूचित जाती 19 जागा, मातंग 1 जागा, वि.जा.भ.ज. 2 जागा, इ.मा.व. 1 जागा, दिव्यांग 2 जागा, अनाथ 2 जागा व खासबाब 3 जागा अशा एकूण 30 जागा
000000

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे