गुन्हेगारी
घरात घुसून खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील टोळीच्या मुसक्या आवळल्या

0
4
2
9
5
7
घरात घुसून खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील दहा जणांना पोलिसांनी केले जेरबंद
गुन्हे शाखा युनिट एक, दोन व अंबड पोलीस ठाणे यांची संयुक्त कामगिरी
शांतारामभाऊ दुनबळे
नविन नाशिक -: सिडको परीसरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा सुगावा लागल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट एक, दोन तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष कामगिरी करीत या १० जणांच्या टोळीला धुळे जिल्हा, मध्य प्रदेश सीमा भाग व नाशिक शहर परिसरातून अटक केली आहे.

या संदर्भात गुन्हा शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना ते म्हणाले, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसापूर्वीच वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने घरात घुसून फिर्यादीच्या मुलाला जीवे मारून टाकू अशी धमकी देत दारावर शस्त्राने वार करीत दार तोडले व फिर्यादीच्या पत्नीवर वार केला. मात्र यावेळी फिर्यादी व त्यांच्या पत्नी यांनी प्रसंगावधान राखल्याने त्या घरात पळून गेल्या. त्यानंतर या टोळक्याने घराशेजारील चार चाकी वाहनाची तोडफोड केली.
ही घटना मंगळवारी घडल्यानंतर फिर्यादीने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ७८/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ (१), ३३३, १८९ (२), १८९ (४), १९२, १९१, (३), १९०, ३२४ (४), ३५२, ३५१ (३), १३५ विविध कलमे अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा संवेदनशील असल्याने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांना तातडीने शोधण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आदींच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम सुरू केली.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एक, दोन, अंबड पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे या गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत असताना गुन्हा शाखा
युनिट एक येथील पोलीस हवालदार विशाल देवरे, विलास चारोस्कर व शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी यांना गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी नाशिक ग्रामीण धुळे जिल्हा मध्य प्रदेश सीमा भाग व १० वा मैल म्हसरुळ परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधाराने पोलिसांनी दहावा मैल, ओझर शिवारातील कुंदन सुरेश परदेशी वय ३३ वर्षे शांतीनगर, मखमलाबाद येथील आदित्य रामदास पिंगळे वय २३ वर्षे, कुणाल सुधाकर एखंडे वय २५ वर्षे आरटीओ ऑफिस म्हसरूळ, पेठरोड येथील राहुल उर्फ हर्षल मनोहर गवारे वय २१ वर्षे, शुभम संतोष पवार वय १९ वर्षे,रोहित सुनील जाधव वय २६ वर्षे राधाकृष्णनगर, म्हसरूळ येथील कमलेश मनोज सुराणा वय २७ वर्षे श्रीरामनगर, दहावा मैल, ओझर तसेच सिडको
येथून मानसी अनामिक वाळके वय ३३ वर्षे पवननगर, सिडका येथील वेदांत सचिन परदेशी वय १९ वर्षे ताब्यात घेतले. या सर्वांना गुन्हा शाखा युनिट एक दोन व अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने तसेच पंचवटी व सिडको परिसरातून ताब्यात घेतले. या मोहिमेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, जगवेंद्र राजपूत, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, विलास पडोळकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड, नाझीमखान पठाण, प्रदीप म्हसदे, देसले, गोरक्ष साबळे, अमोल कोष्टी, मुख्तार शेख, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस मनीषा सरोदे, अनुजा येलवे, महेश खांडबहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार, पवार, गाढवे, मते, इनामदार, राठोड सपकाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
0
4
2
9
5
7