
0
3
3
0
5
1
वाचन संस्कृतीचा प्रसार करणे आणि लहान मुले व युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, या हेतूने या उपक्रमाचा आरंभ शनिवार दिनांक 28 रोजी करण्यात आला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून फक्त वाचनाची आवड असणारे आणि वय वर्षे 9 ते 90 या वयोगटातील कोणाही वाचकाने आवडीची पुस्तके घरी जाऊन वाचायची आहेत आणि त्यावर चर्चा करणे इतकेच अपेक्षित आहे.
रोज आजूबाजूला घडणाऱ्या वाईट घटना आणि त्यातून युवापिढी वाईट वळणाला जाण्याच्या धोक्यापासून वाचवायची असेल, तर अशा सारख्या उपक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन वनस्थळीच्या समन्वयक अनिता गंधे यांनी केले. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले तसेच कुठल्याही चांगल्या सामाजिक कार्यास पाठिंबा देणारे युवाकार्यकर्ते लासलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंतनू पाटील आणि वैष्णवी पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी होती
कुठल्याही सामाजिक कार्याचा आरंभ समविचारी लोकांनी एकत्र येऊन केला, तर ते कार्य चिरकाल टिकते आणि अशा कार्याची आजच्या समाजाला खूप गरज आहे असे शंतनू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात आमच्या केवळ शुभेच्छाच नव्हे तर यासाठी जे जे लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन वैष्णवी पाटील यांनी दिले.
या प्रसंगी वनस्थळीच्या शिक्षिका अर्चना वडनेरे आणि सुरेखा आहेर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास वनस्थळीच्या शिक्षिका त्याचप्रमाणे सौ..उषाताई पवार, सौ.चाफेकर, सौ.भावसार, सौ.सीमा दरेकर, सौ.रंजना शिंपी, प्रा.शिरीष गंधे आणि बालगोपाल यांची उपस्थिती होती. शंतनू पाटील आणि सीमा दरेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
0
3
3
0
5
1