
0
2
5
6
2
9
लक्ष्मण पवार, हतगड
दि. 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी कविवर्य कुसुमाग्रज नगरीत पुरस्कार वितरण सोहळा होणार असुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हतगड, येथील आदर्श शिक्षिका ज्योती नामदेव भोये यांना शिक्षण क्षेत्रातील विविध कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक व राष्ट्रीय देश हिताच्या संवर्धनासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवत असलेले उपक्रम नक्कीच अभिमानास्पद असून शैक्षणिक क्षेत्रात देत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यामध्ये नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ सुरगाणा तालुकाध्यक्ष जी.एम्.चौधरी व तालुका सरचिटणीस दत्तात्रेय बागुल यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षकांच्या उपक्रमासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी सदर शासनमान्य नोंदणीकृत संस्था शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक कविवर्य कुसुमाग्रज शिक्षण सन्मान सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केला आहे.
0
2
5
6
2
9