Breaking
गुन्हेगारी

विंचूरच्या एस बी आय बँकेचे ए टी एम फोडून 30 लाखांहून अधिक रक्कम लंपास

लासलगावचे पोलीस पथक धुळ्याकडे रवाना

0 4 2 9 5 8

विंचूर येवला रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून सुमारे 30 लाख रुपयांहून अधिक रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री नंतर घडली. स्विफ्ट गाडीतून आलेल्या चौघांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून पोवारा केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. सदर घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  भास्कर शिंदे हे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना समवेत घटनास्थळी दाखल झाले.

 चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारले ला होता. या घटनेच्या तपासासाठी श्वान पथक तसेच असे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. शांत पथकाने मुख्य रस्त्यापर्यंत माग दाखवला. अन्य सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक संशयित स्विफ्ट गाडी  लासलगाव चांदवड या दिशेने रवाना झाल्याचे आढळून आले. तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे याच पद्धतीने एटीएम फोडण्यात आल्याची घटना घडल्याने तपास काढण्यासाठी लासलगाव चे पथक धुळ्याकडे रवाना झाल्याचे समजते.

 विंचूर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच ही मोठी घटना घडल्याने विंचूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे