Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

महाराष्ट्रातील वेगाने उदयास येणाऱ्या टियर-2 आरोग्य विमा बाजारपेठांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये पहिल्या विभागीय कार्यालयाची स्थापना करत स्टार हेल्थने आपली पोहोच केली मजबूत

आर्थिक वर्ष 26 मध्ये महाराष्ट्रात 3.5 लाख जणांना विमा संरक्षण पुरवित 2,300 कोटी रु. च्या दाव्यांचे निराकरण

0 4 7 4 6 1

महाराष्ट्रातील वेगाने उदयास येणाऱ्या टियर-2 आरोग्य विमा बाजारपेठांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये पहिल्या विभागीय कार्यालयाची स्थापना करत स्टार हेल्थने आपली पोहोच केली मजबूत; आर्थिक वर्ष 26 मध्ये महाराष्ट्रात 3.5 लाख जणांना विमा संरक्षण पुरवित 2,300 कोटी रु. च्या दाव्यांचे निराकरण

• नाशिकमधील पहिले विभागीय कार्यालय हे महत्त्वाची आरोग्य विमा बाजारपेठ म्हणून शहरातील स्टार हेल्थच्या गुंतवणुकीला अधिक बळकटी देते
• मुंबई नाका येथील श्री कालिका प्लाझामधील 5,000 चौ. फूट कार्यालयात 150 हून अधिक व्यक्तींसाठीची क्षमता असून 9,000 पेक्षा अधिक सल्लागारांना सहाय्य करण्यासाठी प्रशस्त प्रशिक्षण आणि परिषद कक्षाची सुविधा उपलब्ध आहे
• स्टार हेल्थच्या सीएसआर अंतर्गत सुरू करण्यात आलेले नाशिकमधील आरोग्य सेवा केंद्र समुदाय आरोग्यसेवा उपलब्धतेला बळकटी देत असून रुग्ण भेटींची संख्या सातत्याने वाढत आहे; महाराष्ट्रातील पाच केंद्र जवळपास 15,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहेत.
• महाराष्ट्रात आर्थिक वर्ष 26 दरम्यान स्टार हेल्थने 3.5 लाखांहून अधिक जणांना विमा संरक्षण देत 2,300 कोटी रु. पेक्षा जास्त किमतीच्या दाव्यांचे निराकरण केले

नाशिक, 24 जून, 2026: भारतातील आघाडीच्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NSE: STARHEALTH, BSE: 543412) ने आज नाशिक येथे आपल्या पहिल्या विभागीय (झोनल) कार्यालयाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील वेगाने विकसित होत असलेल्या टियर-2 आरोग्य विमा बाजारपेठांपैकी एक असलेल्या नाशिकमधील कंपनीची गुंतवणूक या माध्यमातून अधिक दृढ झाली आहे. ग्राहकांना स्थानिक स्तरावर अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यसेवा भागीदारांना सहाय्य करणे, दाव्यांच्या निराकरण प्रक्रियेला गती देणे आणि या भागातील स्टार हेल्थच्या विस्तृत सल्लागार नेटवर्कशी अधिक प्रभावी संवाद साधणे या उद्देशाने हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्सचे बिझनेस हेड श्री विजय अरोरा यांच्या हस्ते झोनल ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले.

विस्तार होत असलेल्या आरोग्यसेवा परिसंस्थेमुळे नाशिक हे स्टार हेल्थसाठी प्राधान्याचे बाजारपेठीय केंद्र बनले आहे. वाढती आरोग्यजागरूकता, खाजगी आरोग्यसेवेची वाढती मागणी, वाढते वैद्यकीय खर्च आणि विस्तारत असलेले कॅशलेस हॉस्पिटल नेटवर्क यांमुळे आरोग्य विम्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे पूर्णवेळ संचालक श्री. हिमांशु वालिया म्हणाले: “नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या टियर-2 आरोग्य विमा बाजारांपैकी एक आहे. वाढती आरोग्यजागरूकता, वाढते वैद्यकीय खर्च आणि शहरातच दर्जेदार उपचारांना मिळणारे वाढते प्राधान्य या घटकांमुळे हा विकास होत आहे. नाशिकमधील आमचे पहिले झोनल कार्यालय हे या महत्त्वाच्या बाजारपेठेतील ग्राहक, रुग्णालये, सल्लागार आणि समुदायांच्या अधिक जवळ राहण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

महाराष्ट्रात आर्थिक वर्ष 26 दरम्यान स्टार हेल्थने 2,300 कोटी रु. पेक्षा अधिक मूल्याच्या दाव्यांचे निराकरण केले असून 3.5 लाखांहून अधिक जणांना विमा संरक्षण दिले आहे. यामुळे राज्यातील कुटुंबांसाठी विश्वासार्ह आरोग्य विमा भागीदार म्हणून आमची भूमिका अधिक दृढ झाली आहे. आरोग्य विमा अधिक सुलभ, सोपा आणि विश्वासार्ह बनविण्यासोबतच आरोग्य सेवा केंद्रासारख्या उपक्रमांद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवालाही आम्ही अधिक बळकटी देत राहू.”हा बदल आता प्रत्यक्ष स्तरावरही दिसून येत आहे. कॉर्पोरेट रुग्णालये, विशेषज्ञ क्लिनिक्स आणि नर्सिंग होम्स यांच्या पाठबळामुळे नाशिकमधील अधिकाधिक नागरिक शहरातच दर्जेदार आरोग्यसेवा घेण्यास प्राधान्य देत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित पायाभूत सुविधा, उत्तम रस्ते संपर्क आणि तुलनेने कमी आरोग्यसेवा खर्च यांमुळे नाशिकमध्ये आसपासच्या जिल्ह्यांमधील आणि जवळच्या प्रदेशांमधील रुग्णही येत आहेत.

महाराष्ट्र आणि नाशिकमधील कंपनीच्या धोरणात्मक उद्दिष्टाविषयी बोलताना स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे व्यवसाय प्रमुख श्री. विजय अरोरा म्हणाले: “नाशिक झोनल कार्यालयाची रचना ग्राहक, सल्लागार आणि आरोग्यसेवा भागीदारांना क्षेत्रीय स्तरावर अधिक प्रभावी सहाय्य देण्यासाठी करण्यात आली आहे. मुंबई नाका येथील स्थानामुळे येथे सहज पोहोचता येते. तसेच 5,000 चौ. फूट क्षेत्रफळाचे कार्यालय, विस्तारित प्रशिक्षण पायाभूत सुविधा आणि परिषद कक्ष यांमुळे सल्लागारांची क्षमता वाढविणे आणि स्थानिक सेवा अधिक मजबूत करायला आम्हाला मदत होईल. या भागात 9,000 पेक्षा अधिक सल्लागार कार्यरत असून, हे कार्यालय नाशिक तसेच आसपासच्या बाजारपेठांतील कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, प्रथमच आरोग्य विमा घेणारे ग्राहक, रुग्णालये आणि व्यावसायिक भागीदार यांच्याशी अधिक सखोल संवाद साधण्यास मदत करेल.”5,000 चौ. फूट क्षेत्रात पसरलेल्या आणि 150 हून अधिक व्यक्तींसाठीची क्षमता असलेल्या या झोनल कार्यालयात स्टार हेल्थच्या सल्लागार नेटवर्कसाठी प्रशस्त प्रशिक्षण आणि परिषद सुविधा उपलब्ध आहे. जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील मुंबई नाका येथील श्री कालिका प्लाझामध्ये हे कार्यालय स्थित असून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या परिसरात असल्यामुळे मुख्य रस्त्यावर सहज जाता येणं आणि व्यावसायिक तसेच निवासी भागांशी उत्कृष्ट संपर्क उपलब्ध आहे.नाशिकमध्ये आता स्टार हेल्थची 4 कार्यालये, 1 विमा केंद्र आणि 9,000 पेक्षा अधिक सल्लागारांचा समावेश असून, यामुळे शहर आणि आसपासच्या बाजारपेठांमध्ये ग्राहक, सल्लागार आणि आरोग्यसेवा भागीदारांसाठी सेवा पोहोच अधिक मजबूत झाली आहे.

महाराष्ट्रभर दावे निराकरणासाठी सक्षम सहाय्य

महाराष्ट्रात आर्थिक वर्ष 26 दरम्यान स्टार हेल्थने 2,300 कोटी रु. पेक्षा अधिक किमतीच्या दाव्यांचे निराकरण केले असून 3.5 लाखांहून अधिक जणांना विमा संरक्षण दिले आहे. या दावे सहाय्य व्यवस्थेमुळे राज्यभरातील कुटुंबांना वेळेवर उपचार मिळविणे आणि आरोग्यसेवा खर्चाचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्रात स्टार हेल्थने 13,866 कोटी रु. पेक्षा अधिक मूल्याचे दावे निकाली काढले असून 26.4 लाखांहून अधिक दाव्यांचे निराकरण केले आहे. यामुळे गंभीर आरोग्यविषयक गरजांच्या काळात राज्यातील कुटुंबांना महत्त्वपूर्ण आधार मिळाला आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये महाराष्ट्रात कंपनीने GWP मध्ये 14% वार्षिक वाढ (YoY) नोंदवली असून, यामागे वाढलेली ग्राहक उपलब्धता, सल्लागारांद्वारे केलेले जनसंपर्क आणि अधिक सक्षम प्रादेशिक सेवा यांचा मोठा वाटा आहे.राष्ट्रीय स्तरावर आर्थिक वर्ष 26 मध्ये स्टार हेल्थने 11,903 कोटी रु. मूल्याचे दावे निकाली काढत 30.6 लाख दाव्यांचे निराकरण केले. स्थापनेपासून आजपर्यंत कंपनीने 67,800 कोटी रु. पेक्षा अधिक मूल्याचे दावे निकाली काढले असून 1.5 कोटींपेक्षा जास्त दाव्यांचे निराकरण केले आहे.कंपनीच्या दावे व्यवस्थापन क्षमतेला 92% किरकोळ दावे निकाली काढण्याचे प्रमाण, 84% कॅशलेस दावे निकाली काढण्याचे प्रमाण आणि 92% कॅशलेस दावे 3 तासांच्या आत प्रक्रिया केल्याचा मजबूत आधार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळेही दावे प्रक्रियेला अधिक गती मिळत असून, सध्या 75% दावे स्टार हेल्थच्या नव्या क्लेम्स प्लॅटफॉर्मद्वारे हाताळले जात आहेत.

टॉक टू स्टार : आत्मविश्वासाने रुग्णालयात दाखल होण्याचे नियोजन करण्यासाठी ग्राहकांना सहाय्य

नियोजित रुग्णालयीन उपचार प्रक्रिया अधिक सोपी आणि कमी तणावपूर्ण करण्यासाठी स्टार हेल्थने टॉक टू स्टार ही ग्राहकांसाठी समर्पित प्री-अॅडमिशन मार्गदर्शन सेवा सुरू केली आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ग्राहक टॉक टू स्टारवर संपर्क साधून त्यांच्या पॉलिसीतील संरक्षण, नेटवर्क रुग्णालयांचे पर्याय, कॅशलेस प्रक्रियेविषयी माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी याबाबत मार्गदर्शन मिळवू शकतात.ही सेवा ग्राहकांना शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी, दाखल होताना असलेली अनिश्चितता कमी करण्यासाठी आणि उपलब्ध लाभ व पुढील प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या मार्गदर्शनामुळे ग्राहक आणि त्यांचे कुटुंबीय अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात आणि उपचार व पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करू शकतात.रुग्णालयात दाखल होण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना दाखल होण्यापूर्वी मार्गदर्शन आणि सहाय्य मिळविण्यासाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत 7676 905 905 या क्रमांकावर टॉक टू स्टारशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य सेवा केंद्र : समुदाय आरोग्यसेवेच्या सुलभ उपलब्धतेला बळकटी

स्टार हेल्थची नाशिकमधील गुंतवणूक केवळ विमा सेवांपुरती मर्यादित नसून सीएसआर अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आरोग्य सेवा केंद्राद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लवकर निदान आणि आरोग्यजागरूकता यांद्वारे संपूर्ण समुदायाच्या आरोग्यसेवेलाही चालना दिली जात आहे. नाशिकमधील आरोग्य सेवा केंद्र स्थानिक समुदायांना सेवा देत असून, रुग्ण भेटींची संख्या सातत्याने वाढत आहे.महाराष्ट्रभर स्टार हेल्थची 5 आरोग्य सेवा केंद्रे कार्यरत असून या केंद्रातून एकत्रितपणे जवळपास 15,000 लाभार्थ्यांना सेवा मिळाली आहे. राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम 9 राज्यांमधील 32 क्लिनिक्समध्ये कार्यरत असून, वंचित समुदायांमध्ये प्राथमिक आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 4 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे