Breaking
अपघातमहाराष्ट्र

_शिवशाही बसच्या भीषण अपघातात 11 जण ठार,_* 

मृतांची संख्या अधिक असू शकते

0 1 5 1 2 0

*_शिवशाही बसच्या भीषण अपघातात 11 जण ठार,_* 

*किरण घायदार*

_गोंदियात झालेल्या शिवशाही बस अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहे._

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात नागपुरकडून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली आहे. या अपघातात 11 प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती असून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 5-7 मृतदेह आत असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु आहे. तर या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे या अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी घेतली असून जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.   

*देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली*

गोंदियातील शिवशाही बसचा दुर्दैवी अपघाताची बातमी समजतात आता राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली आहे. या अपघाताबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे