0
4
2
9
5
7
नांदगावला बसमध्ये लाख रूपये लंपास
बसस्थानकात येणाऱ्या गावगुंडाचा बंदोबस्त करण्याची मागणी
साकोरा ( प्रतिनिधी ) –
आज दुपारी नांदगाव बसस्थानकात पतीपत्नी नांदगाव- येवला बसमध्ये चढतांना अज्ञात महिलेने पाळत ठेवून गळ्यातील शबनममधून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत नांदगाव पोलिसांत अज्ञात महिलेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून नांदगाव बसस्थानकात भुरट्या चोरांनी तसेच टवाळखोरांनी चांगलाच उच्छाद मांडला असून प्रवाशांना तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना यांचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
आज बुधवार रोजी संभाजी नगर येथील हिंमतराव गांभीरराव देशमुख हे पत्नीसह तहसिल कार्यालयातून माणिक पुंज येथील शेतीचा वार्षिक ठोक्याची एक लाख रुपये रक्कम घेऊन ४ वाजे दरम्यान एम एच ०६एस ८३०४ नांदगाव येवला बसमध्ये चढताना अज्ञात महिलेने तहसिल कार्यालय पासूनच पाळत ठेवून हातचलाखीने शबनमची चैन उघडून एक लाख रुपये लंपास केले.
बस निघण्याच्या वेळेस संबंधित देशमुख यांच्या लक्षात आल्यावर नांदगाव पोलिसांनी बसस्थानक मधील सीसीटीव्ही तपासणी केली असता तोंडावर रुमाल बांधून सदर महिला निघून जात असल्याचे दिसून आले.त्यानंतर लगेच काही टवाळखोरांनी बसस्थानकात येवून एका युवकाला बेदम मारहाण करून फरार झाले त्यामुळे बसस्थानक परिसरात हाहाकार उडाला आणि शालेय विद्यार्थींनी भयभीत झाल्याचे दिसून आले. याबाबत नांदगाव पोलिसांनी दखल घेवून बसस्थानक परिसरात दहशत निर्माण करणार्या या गाव गुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
0
4
2
9
5
7


