विद्यार्थी हे भारताचे भविष्यातील चमकते तारे : न्यायाधीश विलास खांडबहाले
महिरावणी ग्रामपंचायतीकडून गी.दे.पाटील विद्यालयात गुणवंत सत्कार समारंभ
नाशिक:प्रतिनिधी
विद्यार्थ्याने आयुष्यभर विद्यार्थीच रहावे,शिक्षण हे क्षेत्र वाघिणीचे दूध आहे.करियरसाठी विश्व फार मोठे असून दहावीनंतर खूप पर्याय आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी महत्त्वपूर्ण आवश्यक पाच गुण – कावळ्यासारखी(काकदृष्टी) सतर्कता, तत्परता आणि सकाळी लवकर अभ्यास करण्याची गुणवत्ता, जो बगळ्यासारखा(बकध्यान) एकाग्रतेने अभ्यास करतो, जो कुत्र्यासारखा(श्वाननिद्रा)जागरुक झोपतो, अल्पभोजन(अल्पोहार) करणारा (खूप खाल्ल्याने खूप झोप येते आणि आळस येतो), गृहत्यागी(गृहत्याग) म्हणजे घरातील सुखाचा विचार न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे.हे गुण अंगीकारत विद्यार्थ्यांनी आव्हानाना धैर्याने सामोरे जात संधीचे सोने करा, यश मिळवा, खूप मोठे व्हा! तुम्ही भारताचे भविष्यातील चमकते तारे आहात असे प्रतिपादन महिरावणीचे भूमिपुत्र,अकोला येथील न्यायाधीश विलासराव खांडबहाले यांनी केले.
महिरावणी येथील मातोश्री गी.दे. पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारसमारंभाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील होते.व्यासपीठावर सरपंच कचरू वागळे,संस्थेचे उपाध्यक्ष संतू पाटील,मुख्याध्यापक अशोक भदाणे,उपसरपंच सोमनाथ खांडबहाले,ग्रा.सदस्य दिपक वाघ,पोलीस पाटील सौ. दिपाली कैलास खांडबहाले,भाऊसाहेब खांडबहाले,नाशिक कृ.उ.बा.समिती उपसभापती उत्तम खांडबहाले,सामाजिक वनीकरण विभाग सुनीता देशमुख,सर्वसमावेशित विशेष शिक्षिका स्नेहल रिसोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना न्यायाधीश विलासराव खांडबहाले म्हणाले की,मुलांना घडविण्यासाठी शिक्षक आणि पालक दोन घटक अतिशय महत्त्वाचे असून सुसंस्कृत व सुशिक्षित नागरिक घडवण्यासाठी शिक्षक ज्ञानदानाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधतात. दुसरा घटक पालक हे शेती,इतर व्यवसायात कष्ट करून मुलांना वेळ देत असतात.विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात शिकलो म्हणून न्यूनगंड न बाळगता रडायचे नाही तर लढायचे. मी कोण आहे?मला आयुष्यात काय करायचे आहे?हे ओळखून पुढे मार्गक्रमन करत राहिले पाहिजेत,यश नक्कीच मिळते.पालकांनीही मुलांप्रमाणे मुलींना सक्षम करा असे त्यांनी केले.यावेळी महिरावणी ग्रामपंचायतच्यावतीने दहावीत प्रथम पाच अशा नऊ गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प,शाल, कागदपत्रे ठेवण्यासाठी फाईल, रोजनिशी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील उपाध्यक्ष संतू पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार करत अभिनंदन केले.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांमधून राजेश मेढे याने मनोगतात व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांनी केले.यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे महेंद्र निकुंभ, प्रतिष्ठित नागरिक अँड. माधव खांडबहाले, बाळासाहेब चव्हाण, दत्तात्रेय मते, महिरू मते, दत्तात्रेय आहेर, गोरख खांडबहाले, नवनाथ साळवे, अरुण मते,कैलास खांडबहाले,ज्ञानेश्वर मेढे, समाधान पगार,उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे,सुरेखा भामरे,अश्विनी चौरे दिपाली वाडीले खंडू लांबे,दिलीप खांडबहाले, विलास येवले आदींसह महिला पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार,संजय गायकवाड यांनी केले.आभार देवेंद्र देवरे यांनी मानले.यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:-
ग्रामपंचायत महिरावणीच्यावतीने मातोश्री गी.दे.पाटील माध्य विद्यालयातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी कुमारी ईश्वरी खांडबहाले, कुमारी स्नेहल खांडबहाले,कुमारी ज्ञानेश्वरी आहेर कुमारी त्रिशा साळवे,कुमारी सोनाक्षी मते,कुमारी कावेरी पगार,कुमार राजेश मेढे,कुमारी कावेरी खांडबहाले आणि कुमार तुषार कापसे (तालुक्यात दिव्यांग गटात प्रथम),लेखनिक कुमार तुषार खेटरे(इ.९वी) तसेच मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सत्कार प्रमुख पाहुणे, संस्था तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.