Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरधार्मिकशैक्षणिक

योगिराज तुकाराम बाबा गुरुकुल मध्ये रंगला आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा

0 4 2 9 5 7

सागर निकाळे ,निफाङ प्रतिनिधी-

खेडले झुंगे येथील योगिराज तुकाराम बाबा गुरुकुल मध्ये देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शाळेमध्ये दिंडी काढण्यात आली होती. यामध्ये सर्व बालगोपाळांनी वारकरी वेश परिधान केला होता.
मुलींनी डोक्यावर तुळशी घेऊन व मुलांनी हातात टाळ घेऊन ग्यानबा तुकाराम व ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरामध्ये शाळेचा परिसर दुमदुमून सोडला होता.

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पावली खेळत व माऊली माऊली म्हणत फुगडी खेळत वारीचा आनंद घेतला. यावेळेस विद्यार्थ्यांनी संतांचे विविध अभंग लिहिलेले पोस्टर हातात घेतले होते.
यावेळेस खास विद्यार्थ्यांसाठी बाल प्रवचनकार व बाल कीर्तनकार ह. भ.प. ईश्वरीताई गायधनी यांचे संस्कार प्रवचन ठेवण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन शिस्त व संस्काराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. यावेळेस पाहुण्यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई च्या मूर्तीची पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्ती वर आधारित संत तुकाराम महाराजांचा सुंदरते ध्यान उभे विटेवरी |कर कटेवरी ठेवूनिया || हा अभंग गायला तसेच ‘माऊली माऊली’ या गाण्यावर लेझीम नृत्य सादर केले. या वेळेस टाळ-मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल रखुमाईच्या जयघोषाने सर्व शालेय परिसर भक्तीमय वातावरणात तल्लीन झाला होता.शाळेतील विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. दिंडी सोबत गोल रिंगण ही कार्यक्रमाचे मोठे आकर्षण ठरले. यावेळी शाळेचे संचालक रविंद्र गोरडे सरांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी विषयी माहिती दिली व त्यांचे कौतुक करत सांगितले की या प्रकारच्या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे मुलांमध्ये संस्कार रुजतात.

याप्रसंगी विष्णू गायधनी, दिलीप बाराहाते, निवृत्ती गोरडे,योगिता गवळी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे