Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

फुटपाथ पायदळ चालणाऱ्यांसाठी की, दुकानदारांच्या व्यवसायासाठी !

0 4 2 9 5 7

राज्यातील फुटपाथ पायदळ चालणाऱ्यांसाठी की, दुकानदारांच्या व्यवसायासाठी !

‌आपण पहातो राज्यातील बहुतांश शहरांमध्ये फुटपाथचा दुरूपयोग होतांना दिसतो. ह्या सर्व बाबी सरकार, प्रशासन, स्थानिक प्रशासन आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो.पुटपाथ म्हणजे पादचाऱ्यांनी पायी चालण्याची जागा.परंतु सध्याच्या परिस्थितीत राज्यातील अनेक शहरांमध्ये जनुकाय दुकानदारांनी फुटपाथवर आपला कब्जा केला की काय असे चित्र सर्वत्रच दिसून येते.वाढते ट्राफीक,पार्किंगची समस्या आणि फुटपाथवर अवैध व्यवसाय यामुळे पायदळ घालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते व याचा परिणाम दुर्घटनेमध्ये होतो.कारण फुटपाथवरुन चालु शकत नाही,कारण तिथे दुकाने लागली असतात, वाढत्या ट्राफीकमुळे रस्त्यांनी मोठी गर्दी असते या सर्व अडचणींमध्ये पायदळ चालणारे आबालवृद्ध, विद्यार्थी व सर्वसामान्य अडकतात अशा परिस्थितीत सर्वांनाच घरी जाण्याची घाई असते.अशा कठीण परिस्थितीत मोठ्या प्रमाणात दुर्घटना सुध्दा ओढावू शकते आणि अशा घटना झाल्या सुध्दा आहेत.अनेकदा पायदळ चालणाऱ्यांना मागून एखादे वाहन येते आणि दुर्घटना करून निघून जाते.यात दोषी कोण पायदळ चालणारे म्हणावे की वाहन चालविणारे! माझ्यामते यात मुख्य दोषी म्हणजे स्थानिक प्रशासन कारण फुटपाथचा योग्य आणि सटीक उपयोग जर झाला तर आणि फुटपाथ पायदळ घालणाऱ्यांसाठी मोकळी केली तर पायदळ घालणाऱ्यांच्या ९५ टक्के दुर्घटना आपोआप थांबेल. प्रशासन वाहन चालकांचे लायसन्स किंवा हेल्मेट विचारतात मग पायदळ घालणाऱ्यांना फुटपाथवर घालण्याचे का सांगत नाही!कारण फुटपाथवर व्यावसायिकांनी पुर्णपणे अतिक्रमण केले असते.त्यामुळे सरकारने, प्रशासनाने व स्थानिक प्रशासन पायदळ चालणाऱ्यांच्या वाढत्या दुर्घटना पहायला संपूर्ण नागरिकांसाठी राज्यातील संपूर्ण शहरातील फुटपाथ मोकळी केली पाहिजे,असे माझे स्पष्ट मत आहे.नुकतीच एक भयावह आणि अंगावर शहारे येणारी घटना घडली. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मार्गावरील काटली गावानजीक ७ ऑगस्टला अल्पवयीन सहा मुले पहाटे ५.३० च्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाली असता अचानक भरधाव मालवाहू ट्रकने ६ मुलांना चिरडले यात ४ मुलांचा वेदनादायक मृत्यू झाला व दोन अजूनही गंभीर जखमी आहेत.ही जिवंत घटना रस्त्याच्या कडेला चालणाऱ्यां मुलांची आहे,यावरून आपण समजू शकतो की पायदळ किंवा मॉर्निंग वॉक करने सुरक्षित नाही म्हणजेच घराच्या बाहेर निघतांना जीव मुठीत घेऊन निघावे लागते. फुटपाथवर चालनारा असो अथवा रोडच्या कडेला चालनारे असो यांना सुध्दा दुर्घटनेने सोडले नाही. त्यामुळे काही कारण नसताना दुर्घटना किंवा काही चूक नसतांना पायदळ घालणाऱ्यांच्या भयावह दुर्घटना होने अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.यावर सरकारने व स्थानिक प्रशासनाने ताबडतोब अंकुश लावने गरजेचे आहे.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे