Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगसामाजिक

कुमारी केडियाचा अशोका मेडिकव्हर नाशिकमध्ये यशस्वी संजीवनी प्रवास

0 4 2 9 5 7

बेशुद्धतेच्या अंध:कारातून उज्ज्वलतेकडे — (ANE) अॅक्युट निक्रोटाईझिंग एनकेफॅलोपॅथीवर मात करत कुमारी केडियाचा अशोका मेडिकव्हर नाशिकमध्ये यशस्वी संजीवनी प्रवास.

कुमारी केडिया वय वर्ष 20, वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी, अशोका मेडिकल हॉस्पिटल मध्ये बेशुद्धपणा , ताप ,डोकेदुखी साठी तसेच फिट येत असल्याकारणाने डॉक्टर सुशील अंतुर्लीकर ( एम.बी.बी.एस., एम.डी. (मेडिसिन) फिजिशियन यांच्या देखरेखी खाली आयसीयू मध्ये ऍडमिट झाली. त्यानंतर तिच्या महत्त्वाच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या व तिला अॅक्युट निक्रोटाईझिंग एनकेफॅलोपॅथी (ANE) ह्या आजाराचे निदान झाले. तिला गरज असलेले व इमर्जन्सी सर्व औषधोपचार चालू करण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर देखील, तिला मधून मधून फिट येतच होत्या . तिचा बेशुद्धपणा हा वाढतच जात होता . त्याकरिता फिट बंद होण्याचे औषध गरजेनुसार वाढवण्यात आले. तसेच तिला श्वास घेण्यासाठी घशामध्ये श्वासनलिका टाकण्यात आली व व्हेंटिलेटरवर घेण्यात आले.

साधारण सात ते आठ दिवसानंतर तिचे फिट येणे बंद झाले , तिने डोळे उघडणे व काही हालचाली चालू केल्या . तसेच, काही प्रमाणात साध्या सूचनांचे पालन देखील करू लागली. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला तिच्या मूळ गावी अमरावतीला पाठवण्यात आले. डॉक्टर सुशील अंतुर्लीकर फिजिशियन, डॉक्टर विशाल सावळे मेंदू रोग तज्ञ, सर्व इंटेनसिव्हिस्ट , आय सी यु टीम व अशोका मेडिकल हॉस्पिटल च्या सर्व टीमने पेशंटच्या रिकव्हरीसाठी पुरेपूर प्रयत्न केला, व त्याकरिता संपूर्ण केडिया परिवाराने डॉक्टर सुशील अंतुर्लीकर व अशोका मेडिकवर हॉस्पिटलच्या पूर्ण टीमला धन्यवाद दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे