
0
4
2
9
5
7
विंचूर – येथील येवला रोडवरील डावरे कॉम्प्लेक्स मध्ये दि.निफाड को.ऑफ अर्बन बँकेच्या विंचूर शाखेचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र राठी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर श्री.व सौ.नंदलाल बाफना यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
बँकेचे चेअरमन राजेंद्र राठी व संचालक अजय सोनी यांनी उपस्थितांचे स्वागत केले
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, निफाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष अनिल कुंदे, वि. दा.व्यवहारे हे होते. विंचूर येथील वाढती लोकसंख्या, वाढता व्यापार व वाढलेल्या आर्थिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर निफाड अर्बन बँकेच्या शाखेचे येथे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राजाभाऊ शेलार, शिवाजी ढेपले,सुनिल मालपाणी, कैलास सोनवणे, निरज भट्टड,शिवाजी सुराशे, मधुकर राऊत, निवृत्ती सोनवणे, गोपीनाथ ठुबे,कचेश्वर दुसाने, सुभाष कापसे, बाळकृष्ण कल्याणकर पत्रकार डी बी काद्री, प्रकाश जाजू, संदीप शिरसाट, राजेंद्र भारती, इस्माईल मोमीन,आदींनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी दि.निफाड अर्बनचे व्हा. चेअरमन विलास निरभवणे, संचालक विजयकुमार बोरा, रामदास व्यवहारे, परमानंद गोसावी, प्रविण कराड, संजय पोफळीया, आनंद दायमा, कृष्णा नागरे, सचिन गिते, अँड प्रविण ठाकरे,अजय सोनी, संकेत डोखळे, मनोहर सांगळे, वैशाली दुधेडीया, हेमलता चोरडीया, सी.ए.रविकुमार राठी,सी.ए.प्रसाद भुतडा, नानासाहेब सोमवंशी, संजय गाजरे, डॉ भूषण राठी, संकेत चोरडीया, प्रसाद व्यवहारे,प्रणिल कराड, मुख्य कार्यकारी अधिकारी मोहनलाल सुराणा, कल्याण पवार, सुधाकर आव्हाड, शोभा मोरे, विजय वाघ आदींसह निफाडकर नागरिक व विंचूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
4
2
9
5
7



