Breaking
सामाजिक

नाशिक सायकलींग फाउंडेशन ग्रुपचे विंचूर येथे स्वागत

0 3 2 1 2 3

विंचूर-

नवरात्रोत्सवानिमित्त नाशिकच्या सायकलींग फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी नाशिक येथून कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी सायकल वारी काढली. या सायकल वारीचे विंचूर येथे आज रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता आगमन झाले असता येथील एसबीआय बँकेच्या परिसरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी येथील प्रसिद्ध उद्योजक, व्यापारी सुनील शेठ मालपाणी यांनी येथील स्वागत रेस्टॉरंट मध्ये सर्वांची नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती.

यावेळी सायकल चालवा आरोग्य वाचवा, पर्यावरण वाचवा झाडे जगवा हा संदेश नाशिक ते येवला प्रवासादरम्यान देण्यात येत असल्याचे सायकलिंग फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले. गेल्या सात वर्षापासून येवल्याच्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान कोरोना प्रादुर्भावामुळे सायकल वारी बंद होती. नाशिक सायकलिंग फाउंडेशन ग्रुप हा श्रीक्षेत्र शेगाव, पांडुरंगाचे पंढरपूर असा दूरवरचा प्रवास सायकल वरून करतात. आजच्या या सायकल रॅलीमध्ये सुमारे दीडशे सदस्य सहभागी झालेले होते.

यावेळी सायकलिंग फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष मनीषा रौंदळ, उपाध्यक्ष अरुण पवार, सचिव संजय पवार, दीपक भोसले, सुरेश डोंगरे, माधुरी गडाख, प्रवीण कोकाटे, माजी अध्यक्ष प्रवीण खाबिया, किशोर माने यांच्यासह विंचूर प्रेस क्लबचे अध्यक्ष डी. बी.कादरी, किशोर पाटील, संदीप शिरसाट, दीपक घायाळ, भाऊसाहेब हुजबंद, सूरज भट्टड, संजय गगड, के टी एच एम महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पल्लवी येवलेकर, सौरभ मालपाणी सुभाष महाजन आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे