पाण्याखालील पहिली यशस्वी “प्रसूती” अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये
नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांनी गर्भवती महिलांसाठी आधुनिक प्रसूती तंत्रज्ञानाचा अवलंब करत डॉ. श्रद्धा सबनीस, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोग विभाग यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी पाण्याखालील डिलीव्हरी (अंडरवॉटर डिलीव्हरी) केली आहे.
पाण्याखालील डिलीव्हरी ही एक आधुनिक तंत्र आहे, जी जगभर लोकप्रिय आहे. या प्रक्रियेमुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात, मानसिक ताण हलका होतो आणि मातेसाठी अधिक आरामदायक अनुभव मिळतो.
या यशस्वी प्रक्रियेबद्दल डॉ. श्रद्धा सबनीस म्हणाल्या “अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आम्ही मातांना सर्वात सुरक्षित आणि नैसर्गिक प्रसूती अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. ही यशस्वी पाण्याखालील डिलीव्हरी मातृत्व आरोग्यसेवेमध्ये आमच्या वचनबद्धतेचे आणि नवकल्पनांचे प्रतीक आहे.”
डॉ. सुशील पराख, मेडिकल डायरेक्टर यांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि उत्तर महाराष्ट्रासाठी या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी रुग्णालयाच्या अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्तर महाराष्ट्रातील लोकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला. पुढे ते म्हणाले, पाण्याखालील डिलेव्हरी ही एक सुखद आणि सर्वसमावेशक प्रसूती अनुभव देते, आणि हे प्रगत तंत्रज्ञान उत्तर महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला अभिमान वाटतो. डॉ. श्रद्धा सबनीस आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
श्री अनूप त्रिपाठी, सेंटर हेड म्हणाले रुग्णसेवेमध्ये नवे मापदंड प्रस्थापित करणे हा आमचा उद्देश आहे, आणि ही उपलब्धी त्याचा उत्तम पुरावा आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल आजूबाजूच्या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा प्रदान करण्यात अग्रगण्य राहील. ही ऐतिहासिक कामगिरी उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवणारा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून अधोरेखित करत आहे. जिथे अत्याधुनिक सुविधा आणि काळजीपूर्वक उपचार यांचा अद्वितीय संगम आहे.