विंचूर येथील सहजयोग परिवार आयोजित भक्ती संगीताचा कार्यक्रम

विंचूर प्रतिनिधी:
विंचूर येथील सहजयोग परिवार आयोजित परमपूज्य श्रीमाताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोगाद्वारे आत्मसाक्षात्कार व अमरावतीचे दलाल बंधू डॉक्टर संदीप दलाल, प्रा. मिलिंद दलाल त्याचप्रमाणे नाशिकचे सुप्रसिद्ध गायक प्रा.आनंद अत्रे यांचा सुमधुर भक्ती संगीताचा कार्यक्रम सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 7:30 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर या ठिकाणी आयोजित केला आहे.
परमपूज्य श्रीमाताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोग ही आत्मज्ञानाची एक सोपी पद्धत आहे. प्रत्येक मानवाच्या माकडहाडामध्ये ही कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेत व साडेतीन वेटोळे घालून बसलेली असते. सहजयोगाद्वारे ती जागृत होऊन साधकाचा सर्वव्यापी परमेश्वरी शक्ती बरोबर योग घटित होतो. यामुळे साधकाला स्वतःच्या टाळूवर किंवा तळ हातावर थंड चैतन्य लहरींची जाणीव होते व निर्विचार अवस्था प्राप्त होते. परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांच्या कृपा आशीर्वादाने आत्मसाक्षात्काराचे हे पवित्र ज्ञान मानव जातीसाठी सुलभ झाले आहे. संपूर्ण विश्वामधील 170 हून अधिक देशातील लोकांनी सहजयोगाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्त करून आपले जीवन समृद्ध केलेले आहे. आपणही चैतन्य लहरींची तसेच परमशांतीची अनुभूती घेऊन आपले जीवन समृद्ध केले पाहिजे.
सहजयोग ध्यानधारणा नियमित केल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते. मानसिक ताण-तणावापासून मुक्तता मिळते. विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्तीचा व एकाग्रतेचा विकास होऊन अभ्यासात प्रगती होते.सुख-शांती समाधान व निरानंदाची प्राप्ती होते. सहजयोग ध्यान पद्धत अत्यंत सोपी असून संसारी लोकांना आपली नोकरी व्यवसाय सांभाळून करता येते.चैतन्य लहरी द्वारे कृषी क्षेत्रात प्रगती होते. सहजयोगाचे संपूर्ण ज्ञान नि:शुल्क प्रदान केले जाते.
या कार्यक्रमाला विंचूर व परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक जिल्हा सहजयोग परिवारातर्फे करण्यात आले आहे.