शैक्षणिक
विंचूर विद्यालयात योगा दिन उत्साहात साजरा
0
1
5
1
2
1
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगदिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच विविध योगासानांची प्रात्यक्षिके करून दाखविली. विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले. याप्रसंगी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन. इ. यांनी विद्यार्थी दशेपासून मुलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व त्यासाठी व्यायाम, योगा तसेच ध्यानसाधना या बाबी जोपासल्या पाहिजेत असे सांगितले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर राजेंद्र चांदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. जेष्ठ शिक्षक भोसले यांनी आभार मानले.
0
1
5
1
2
1