Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंग

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी” यशस्वी 

0 3 2 9 4 3

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी” यशस्वी 

> डॉ. राज नगरकर, व्यवस्थापकीय संचालक, डॉ. ईशान नेरकर, न्युरो व स्पाईन सर्जन, डॉ. निलेश सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी (COO), किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिक 

नाशिक १७ जून : उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे किम्स मानवता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल , नाशिक येथे आज अत्याधुनिक पद्धतीने एंडोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) तंत्रज्ञानाचा वापर करून पाठीच्या कण्याशी संबंधित विकारांवर अचूक, सुरक्षित आणि कमी वेदनादायी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, स्लिप डिस्क, स्पायनल स्टेनोसिस, मज्जातंतूंचा दाब, पाठदुखी आणि कण्यातील बिघाड यांसारख्या आजारांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत या मुळे रुग्णांना जलद बरे होण्याचा हा एक नवा अनुभव आहे. 

डॉ. राज नगरकर, व्यवस्थापकीय संचालक, किम्स मानवता हॉस्पिटल म्हणाले, नाशिकमध्ये जागतिक दर्जाच्या उपचार पद्धती आणण्याच्या आमच्या ध्येयाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना दर्जेदार आणि सुरक्षित उपचार या विभागात दिले जात आहेत. पुढे ते म्हणाले, नाशिकमधील आरोग्यसेवेच्या दर्जात मोठी भर घालणारा टप्पा आहे. किम्स मनवता हॉस्पिटल हे आरोग्यसेवेत अग्रगण्य असून, आम्ही स्थानिक स्तरावर जागतिक दर्जाची उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. किम्स मनवता हॉस्पिटलने पुन्हा एकदा नाशिकला आधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवेचे केंद्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

डॉ. ईशान नेरकर, न्युरो व स्पाईन सर्जन, यांनी सांगितले की, एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमुळे रुग्णांना खूपच कमी वेदना होतात, रुग्ण लवकर चालू लागतो आणि औषधांची गरजही कमी भासते. यापूर्वी अशा अत्याधुनिक सर्जरी फक्त मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये होत होत्या. पण आता ही सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो.

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये सुरू झालेली ही आधुनिक उपचारपद्धत उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी एक मोठे वैद्यकीय पाऊल आहे. पारंपरिक ओपन स्पाईन सर्जरीमध्ये मोठी चिरफाड करावी लागते, दीर्घ बेडरेस्ट आवश्यक असतो, रुग्णाला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते आणि स्क्रू-रॉड्सचा वापर करावा लागतो.

पण एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये हे सर्व त्रास टाळता येतात. ही प्रक्रिया अत्यल्प व्यत्ययाची आहे – स्क्रू व रॉड्सची गरज नाही आणि रुग्ण काही तासांतच चालू लागतो. २४ ते ४८ तासांमध्ये रुग्णाला डिस्चार्जही देता येतो. ही खरोखरच स्पाईन सर्जरीतील एक क्रांतिकारी वाटचाल आहे.”

या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर, सर्जन, व्यवस्थापन रुग्ण रुग्णांचे नातेवाईक व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे