
0
2
5
6
6
2
रोहिले बुद्रुक येथे घरकुलांचे मंजूर पत्र व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम संपन्न
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 10 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी पत्र व 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम – पुणे दुरस्त सहभाग म्हणून गृहमत्सोवाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित लाभार्थ्यांना प्रमाणपत्रचे वाटप करून त्यांचा सत्कार रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत चे सरपंच ठकुबाई देविदास पवार, उपसरपंच सौ. सुनंदा मुक्ताराम बागुल,व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील 2024-2025 च्या लाभार्थ्यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी शनिवारी दुपारी 3 वाजता गृहमंत्री महोदय, भारत सरकार व मा. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी घरकुल लाभार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद या सत्रात कार्यक्रम पुणे येथे घेण्यात आला. त्या अनुषंगाने रोहिले बुद्रुक येथील एकूण 31 पात्र लाभार्थ्यांची यादी चे नाम फलक लाभार्थ्यांना माहिती होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला लावण्यात आले होते. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सदरचा कार्यक्रम पार पाडताना उपस्थित असलेल्या पात्र व मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच ठकुबाई देविदास पवार, उपसरपंच सौ. सुनंदा मुक्ताराम बागुल, ग्रामपंचायत सदस्य सोपान दत्तात्रय गायके, ग्रामपंचायत सदस्य, सुरेश भास्कर बागुल व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते घरकुल मंजुरी पत्राचे व प्रथम हप्ता चे ऑनलाईन वितरण करण्यात आले.
परंतु कुठल्याही प्रकारची ग्रामसभा घेण्यात आलेली नव्हती ग्रामसभा फक्त आणि फक्त घरकुल मंजुरी पत्राचे व प्रथम हप्ता ऑनलाइन वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरपंच ठकुबाई देविदास पवार,सौ. सुनंदा मुक्ताराम बागुल, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल, सोपान दत्तात्रय गायके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुख्याध्यापक सूर्यवंशी सर, शिक्षक, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल, गावातील रवींद्र यादव बागुल, अनिल केशव बागुल, काशिनाथ वेडु चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल संताराम अरबुज तसेच गावातील इतर ज्येष्ठ नागरिक व महिला आणि पात्र घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
0
2
5
6
6
2