ब्रेकिंग
चिंचोलीच्या भूमीकन्येची दुबईतील कंपनीत निवड

0
3
2
1
2
3
चिंचोलीच्या भूमीकन्येची दुबईतील कंपनीत निवड
जिद्द,चिकाटी ने मिळविले यश : पुण्याच्या डी वाय पाटील कॉलेजमधून मिळाली प्लेसमेंट
नाशिक : प्रतिनिधी
चिंचोली ता. सिन्नर येथील वंदना आणि प्रभाकर बाबुराव दराडे यांची कन्या,पुणे येथील डी.वाय.पाटील इंजीनियरिंग कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा प्रभाकर दराडे हिला दुबई च्या नामांकित “पोलारीस इंटरनॅशनल इंडस्ट्रीज्”मध्ये प्लेसमेंट मिळाली आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द,चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर तिने यश मिळवले असून तिचे सर्वत्र अभिनंंदन होत आहे.
अपूर्वा हिने राष्ट्रसंत आचार्य आनंद रुषीजी इंग्लिश मीडियम स्कूल इंग्लिश मीडियम नाशिकरोड येथे माध्यमिक पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे गुरु गोविंद सिंग पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आणि सध्या पुण्यातील डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून बीई सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर आणि निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील प्रगतशील शेतकरी रामदास सोनवणे यांची ती भाची आहे. यावेळी अपूर्वाचा मांजरगाव येथे गंभा.लिलाबाई दादा सोनवणे आणि सौ. मनुबाई बाबुराव दराडे या दोन्ही आजींच्या हस्ते शाल देऊन पेढे भरवून कौटुंबिक सत्कार करण्यात आला. सोहळ्यात कुटुंबातील सदस्यांचे आनंदाश्रु तरळले.यावेळी बाळासाहेब सोनवणे ,प्रभाकर दराडे, संतोष ढगे, रामदास सोनवणे, ईश्वर सानप (बोकडदरे),वंदना दराडे, सुरेखा सांगळे, गायत्री सानप,साक्षी सांगळे, श्रद्धा सोनवणे, श्रेया सोनवणे,श्रावणी सोनवणे, चि.मल्हार सानप यांनी उपस्थित राहून अपूर्वाचे अभिनंदन केले.
सिव्हिल पदविका करतांना मी खूप मेहनत केली, रात्रंदिवस अभ्यास केला. परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. मला शिष्यवृत्ती मिळाली आणि मी पूणे येथील डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये गेली. अनेक आव्हानांचा सामना केला,पुस्तकांसाठी पैसा नाही आणि समाजाचा दबाव. पण मी स्वतःवर विश्वास ठेवला. आज या परिश्रमाचे दुबईतील कंपनीत निवड झाल्याबद्दल चीज झाले आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्य कितीही कठीण असले तरी हार मानू नका.तुमचा आजचा संघर्ष उद्या तुमची ताकद बनेल. प्रयत्न करत राहा, शिकत राहा, यश नक्की मिळेल.
– इंजि.अपूर्वा प्रभाकर दराडे,
विद्यार्थिनी,डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे
0
3
2
1
2
3