Breaking
अपघातई-पेपरकृषीवार्तागुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

शेळके वस्तीवर बिबट्याने पाळीव कुत्र्याला केले फस्त

थरार सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद

0 3 2 1 2 3

ठाणगाव, येवला/प्रतिनिधी -: ठाणगाव गुजरखेडारोड लगत असलेल्या शंकर सुकदेव शेळके यांची शेतात वस्ती असून सदर वस्ती गावापासून उत्तर दिशेला अगदी हाकेच्या अंतरावर आहे वस्तीच्या दोन्ही बाजूला घरे देखील आहेत शंकर शेळके यांचे चिरंजीव सोपान शेळके सेंद्रीय शेती करतात त्या सोबतच त्यांचा गिर आणि क्रांकेज या देशी गोवंश असलेल्या गाईंचा गोठा आहे, गाईंचे व वस्तीच्या संरक्षणासाठी त्यांनी कुत्रा पाळलेला होता, काल रात्री बिबट्याने घरासमोर असलेल्या गोठ्याजवळून कुत्र्यावर अचानक हल्ला करत कुत्र्याला थोड्या अंतरावर ओढत नेऊन ताव मारला सुदैव त्यावेळी बिबट्याने एकही गाईवर हल्ला केला नाही व वस्तीवरील कोणी मनुष्य देखील घराबाहेर नव्हते, सदर बिबट्याचा अंदाजे दोन महिन्यापासून या परिसरात वावर असून शेळके मळ्याच्या परिसरात तीन-चार दिवसापासून अनेकांना नजरेस पडत आहे, ठाणगाव गावालगत फ़ॉरेस्ट एरिया असून बिबटयाला दिवसा लपण्यासाठी जागा सहज उपलब्ध होते बिबट्याने गावातील भरपूर कुत्रे फस्त केले असावेत असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे कारण अनेक शेतवस्ती वरून कुत्रे गायप झालेले आहेत, काल पांडुरंग कोंढरे यांच्या वस्तीवर सेंद्रीय शेती गटाची शेतकरी संवाद बैठक होती यावेळी ठाणगाव परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले असता मंडळ कृषि अधिकारी श्री बडाख व कृषि सहाय्यक धनंजय सोनवणे यांनी जंगली प्राण्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासंदर्भात माहिती दिली होती…दोन महिन्यापूर्वी फ़ॉरेस्टलगत महेश शेळके यांच्या वस्तीवर शेततळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या धनंजय सोनवणे यांना देखील फ़ॉरेस्टजवळ बिबट्याचे जवळून दर्शन झाले होते…शेतवस्तीवरील नागरिकांनी लहान मुले, शाळकरी मुले यांना एकटे सोडू नये तसेच पाळीव जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच भवर यांच्याकडून करण्यात आले असून वन विभागाने लवकरात लवकरच पिंजरा लावण्याची मागणी जोर धरत आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे