एसटीत झाली महिलेची डिलिव्हरी…
रक्षाबंधनाला निघालेल्या गर्भवतीला महिला कंडक्टर आणि नर्सने केली मदत
सोशल व्हायरल….
किरण घायदार
बस प्रवासात अनेक घटना घडतात…मात्र तेलंगणामधून एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये रक्षाबंधनासाठी भावाकडे निघालेल्या गरोदर महिलेची एसटी बसमध्येच डिलिव्हरी करावी लागली. डिलिव्हरी करण्यासाठी बसच्या महिला कंडक्टरने पुढाकार घेतला आणि त्यानंतर बसमध्ये प्रवासी म्हणून असलेल्या नर्सने सर्व सूत्रे हाती घेतली आणि डिलिव्हरी यशस्वी केली.
ही घटना तेलंगाणामधील गडवाल-वानपर्थी मार्गावर धावणाऱ्या सरकारी बसमध्ये घडली आहे.
दरम्यान,बसमध्ये डिलिव्हरी करण्यात आलेल्या महिलेचे नाव संध्या असू असून, ती गडवाल या गावची रहिवासी आहे. रक्षाबंधनानिमित्त वानापर्थी या गावी राहत असलेल्या तिच्या भावाकडे जात होती. पण प्रवास सुरू असतानाच तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि महिला कंडक्टर आणि प्रवासी नर्सच्या मदतीने तिने बाळाला जन्म दिला.
सध्या सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत असून, बसच्या महिला कंडक्टर आणि प्रवासी नर्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील महिलेने मुलीला जन्म दिला असून, पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
????तेलंगणा परिवहन सेवेने प्रवास करत असलेल्या महिला प्रवाश्याची डिलिव्हरी बसमध्येच झाल्याने, जन्म झालेल्या बाळाल आजन्म बसप्रवास मोफत केल्याची घोषणा VCMD (तेलंगणा परिवहन) यांनी केली.
तसेच बसमध्ये असलेल्या नर्सने केलेल्या मदतीसाठी बक्षीस म्हणून एक वर्ष मोफत बस पास, तसेच चालक-वाहक यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.