ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
रियलमी १५ सिरीज ने जगातील पहिले एआय एडिट जिनी तंत्रज्ञान आणि एआय पार्टी फोन केला सादर
0
4
2
9
5
7
नाशिक २५ जुलै २०२५: भारतातील युवकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला स्मार्टफोन ब्रँड रियलमी ने आज रियलमी १५ प्रो ५जी आणि रियलमी १५ ५ जी हे नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. ‘एआय पार्टी फोन’ म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही मॉडेल्स कॅमेरा गुणवत्ता, प्रगत एआय आणि एकूणच कार्यक्षमतेसाठी नवे मापदंड निर्माण करतात.
विविध जीवनशैलीचा स्वीकार करणाऱ्या तरुण पिढीला लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या रियलमी १५ सिरीज मध्ये ट्रिपल ५०एमपी अल्ट्रा-क्लिअर कॅमेरे आणि ४के ६० एफपीएस व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे, ज्यामुळे कोणत्याही कोनातून, कोणत्याही क्षणी स्पष्ट आणि जिवंत चित्रण करता येते. याशिवाय, ही सिरीज एआय इमेजिंगच्या क्षेत्रात क्रांती घडवते, कारण यामध्ये जगातील पहिले एआय एडिट जिनी तंत्रज्ञान आणि विशेषतः तरुण वापरकर्त्यांसाठी तयार केलेला एआय पार्टी मोड समाविष्ट आहे.
रियलमी १५ प्रो ५जी , ४ स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे (८+१२८ , ८+२५६, १२+२५६ आणि १२+ ५१२ ) आणि बेस व्हेरिएंटची किंमत ₹ ३,००० किमतीच्या बँक ऑफरनंतर रुपये २८,९९९ पासून सुरू होते. रियलमी १५ प्रो ५जी फ्लोयिंग सिल्व्हर, वेलवेट ग्रीन आणि सिल्क पर्पल आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे
रियलमी १५ ५जी, ३ स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे (८+१२८, ८+२५६, १२+२५६) आणि बेस व्हेरिएंटची किंमत ₹ २,००० किमतीच्या बँक ऑफरनंतर रुपये २३,९९९ पासून सुरू होते. रियलमी १५ ५जी फ्लोयिंग सिल्व्हर, वेलवेट ग्रीन आणि सिल्क पिंक या रंगपर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
रियलमी बड्स टी २०० ची किंमत ₹ १९९९ असून, हे चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.मिस्टिक ग्रे , स्नोई व्हाईट, ड्रीमी पर्पल आणि नियॉन ग्रीन. ग्राहक बँकेच्या ₹ ३०० च्या ऑफरनंतर हे फक्त ₹ १६९९ मध्ये खरेदी करू शकतात.
0
4
2
9
5
7





