ब्रेकिंग
पावसाळ्यात त्वचेच्या आजारांचे प्रमाण वाढते; वेळेत उपचार घेणे गरजेचे

0
4
7
7
8
9
पावसाळ्यात त्वचेच्या आजारांचे प्रमाण वाढते; वेळेत उपचार घेणे गरजेचे
नाशिक :
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे त्वचेशी संबंधित विविध आजारांचे प्रमाण वाढते. बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन), खाज, त्वचेवर पुरळ, पायांवरील संसर्ग, ॲलर्जी आणि एक्झिमा यांसारख्या समस्यांना या काळात विशेषतः सामोरे जावे लागते. योग्य स्वच्छता, त्वचेची काळजी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतल्यास या आजारांपासून बचाव करणे शक्य असल्याची माहिती अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या त्वचारोग विभागाकडून देण्यात आली.
पावसामुळे कपडे, पादत्राणे आणि त्वचा बराच वेळ ओलसर राहिल्यास बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे मांडी, काख, बोटांमधील जागा तसेच मान आणि पाठीवर फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. तसेच दूषित पाण्याचा संपर्क, चिखल आणि अस्वच्छता यामुळे त्वचेचे इतर संसर्गही होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात दररोज आंघोळ करून शरीर पूर्णपणे कोरडे ठेवणे, सुती व सैल कपडे वापरणे, भिजलेले कपडे त्वरित बदलणे, इतरांचे टॉवेल किंवा कपडे वापरणे टाळणे आणि त्वचेवर खाज किंवा पुरळ दिसल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांनी, लहान मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास संसर्ग वाढण्यापासून रोखता येतो आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते.
पावसाळ्यात त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या जाणवल्यास विलंब न करता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
0
4
7
7
8
9



