Breaking
क्रिडा व मनोरंजन

‘पुकार – दिल से दिल तक’ मालिकेत वेदिका आणि कोयल एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकणार

0 3 2 1 2 3

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुकार – दिल से दिल तक’ या हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिकेत प्रेमाची आणि हरवण्या-गवसण्याची कहाणी आहे. जयपूरच्या रंगीत पार्श्वभूमीवर बेतलेल्या या कहाणीत एक आई आणि तिच्या दोन मुली यांना एका कुटिल योजनेने एकमेकींपासून वेगळे केले आहे. पण 20 वर्षांनी आपल्या कुटुंबाची वाताहत करणाऱ्या ताकदीविरुद्ध एकत्र होऊन लढण्यासाठी नशीब त्यांना पुन्हा एकत्र घेऊन आले आहे.

आगामी भागांमध्ये, खाटू श्यामजींच्या पूजेदरम्यान कोयल राजेश्वरीच्या लॉकरमधून एक मौल्यवान हार चोरण्याचा प्रयत्न करते. राजेश्वरी या संधी फायदा घेऊन पद्मा आणि किशोरीलाल या वेदिकाचा सांभाळ करणाऱ्या माता-पित्यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान वेदिका हे शोधून काढते की, या दरोड्याच्या मागची मुख्य सूत्रधार मयूरी आहे. मयूरीला तुरुंगात टाकण्यासाठी ती चंग बांधते. या दरम्यान, कोयलला एक धक्कादायक गोष्ट समजते. जान्हवीला तिच्या लहानपणी राजेश्वरीने दिलेल्या कलशाविषयी तिला समजते. हा कलश देताना भविष्यात सागरची पत्नी म्हणून जान्हवीला महेश्वरी कुटुंबात सून म्हणून आणण्याचे वचन राजेश्वरीने दिलेले असते. पद्मा आणि किशोरीलाल हा कलश वेदिकाला देतात. वेदिका हीच जान्हवी आहे हे ओळखून कोयल सूड उगवण्यासाठी एक योजना आखते. ती त्या कलशासारखाच दुसरा एक कलश मिळवते आणि सरस्वतीची हरवलेली मुलगी जान्हवी आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्या कलशाचा उपयोग करायचे ठरवते.

 या आठवड्यात घडणाऱ्या नाट्याविषयी बोलताना वेदिकाची भूमिका करणारी अभिनेत्री सायली साळुंके म्हणते, “हा आठवडा प्रेक्षकांसाठी हृदयद्रावक असणार आहे. आत्तापर्यंत वेदिका आणि कोयल एकमेकींच्या मैत्रिणी होत्या, पण आता अशी दृश्ये आहेत, ज्यात कोयल आणि वेदिका एकमेकींशी भांडताना दिसतील. पडद्यावर आणि पडद्याच्या मागे देखील माझी आणि अनुष्काची छान मैत्री आहे. आम्ही प्रेमाने एकमेकींना ‘बहन’ म्हणतो. त्यामुळे मालिकेत एकमेकींबद्दल अलीकडेच मनात उद्भवलेला राग आणि गैरसमज आपल्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून व्यक्त करणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. प्रेक्षकांना मात्र या आठवड्यात भरपूर नाट्य बघायला मिळणार आहे, खूप चढ-उतार अनुभवायला मिळणार आहेत. त्याबाबत मी खूप उत्सुक आहे.”

 बघत रहा, ‘पुकार – दिल से दिल तक’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे