Breaking
शैक्षणिक

विखे पाटील मेमोरियल स्कूल मध्ये अवतरली शिवशाही

0 3 2 1 2 3

विखे पाटील मेमोरियल स्कूल मध्ये अवतरली शिवशाही

विंचूर येथील विखे पाटील मेमोरियल स्कूल मध्ये दिनांक 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तसेच त्यांच्या मावळ्यांची विविध वेशभूषा करून गावातून बाईक रॅली काढली. ही बाईक रॅली शाळेपासून सुरू होऊन गावातील मुख्य रस्त्यांवरून बाजार गल्लीत असलेल्या शिव स्मारका पर्यंत काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भाषण, पोवाडा, नृत्य तसेच अफजलखान वध हे नाटक प्रस्तुत केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक गण शालेय कर्मचारी पालक आणि इतर ग्रामस्थांसोबत सरपंच सचिन दरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे