न्यू ब्लॉसम्स् इंग्लिश मिडीयम स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम
विंचूर – एस.एस.सी.बोर्ड मार्च २०२४ च्या परिक्षेत येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू ब्लॉसम्स इंग्लीश मिडीयम स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.
यामध्ये प्रामुख्याने अभयसिंग बाळासाहेब जगताप याने ८८ % गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर अर्ष जाहिदखान मन्सुरी याने ८४.६० % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच संस्कृती संतोष ठुबे हिने ८३% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला. तर यश विजय तरटे याने ८१.४०%गुण मिळवत चतुर्थ क्रमांक मिळवला.तसेच यश किरण क्षीरसागर याने ७९.४०% गुण मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय दरेकर,उपाध्यक्ष संतोष उशीर, सचिव अविनाश दुसाने, संचालक, सतिष सांगळे, चंद्रकांत साईनकर कैलास भालेराव, नरेंद्र कल्याणकर ,संजय झाल्टे, न्यू ब्लॉसम्स् इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या ज्योती माठा, समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोहिनी कुलकर्णी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.