Breaking
सामाजिक

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

0 3 2 1 2 4
मंत्री छगन भुजबळ यांच्या निफाड व येवला तालुका परिसरातील २२ कोटी १६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
नाशिक, लासलगाव, दि.४ ऑक्टोबर :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून करण्यात आलेल्या निफाड तालुका परिसरातील १६ कोटी ३२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे त्यांच्या हस्ते आज (दि.५ सप्टेंबर २०२४) रोजी भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये धरणगाव खडक, धारणगाव वीर, नांदगाव, वनसगाव, खडक माळेगाव येथील विकास कामाचा समावेश आहे. तसेच विंचूर येथे बांधकाम कामगारांना संच वाटप करण्यात येणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धारणगांव येथे आगमन व आदिवासी वस्तीमध्ये सभामंडप बांधणे र.रु.१५ लाख, स्मशानभूमीजवळ कॉक्रीटीकरण करणे.र.रु.१५ लाख,बौद्ध विहाराचे सुशोभीकरण करणे र.रु.८.०० लाख, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, धारणगांव खडक-गाजरवाडी प्रजिमा-१२७ किमी १६/५०० ते १९/०० ची सुधारणा करणे ३ कोटी ५० लाख, धारणगांव खडक धोंडीराम बेडे वस्ती साठवण बंधारा दुरुस्ती ११ लाख, धारणगांव खडक बंधारा क्र.१ दुरुस्ती करणे १२ लाख, बंधारा क्र.२ दुरुस्ती करणे १२ लाख, बंधारा क्र.३ दुरुस्ती करणे १५ लाख या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
धारणगांव वीर येथे आगमन व स्मशानभूमीचे काम करणे व अनुषंगिक कामे करणे १५ लाख, महादेव मंदिरासमोर ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर सामाजिक सभागृह बांधणे १५ लाख, तलाठी कार्यालय बांधणे ३० लाख, शाळा खोली दुरुस्ती-४.३५ लाख,नांदगांव येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये सभामंडप व सामाजिक सभागृह बांधणे १५ लाख, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधणे २० लाख, सभामंडप बांधणे १५ लाख या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
वनसगांव येथे तलाठी कार्यालय बांधणे ३० लाख, शाळा खोली बांधणे ९.९० लाख, साठवण बंधारा दुरुस्ती करणे १५ लाख, वनसगांव-थेटाळे-कोटमगांव रस्ता प्रजिमा-१७४ किमी १२/४०० ते १७/६०० मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे व सुधारणा करणे ३ कोटी, खडकमाळेगांव येथे तलाठी कार्यालय बांधणे ३० लाख, मुस्लीम समाजाकरिता शादिखाना बांधकाम करणे २० लाख, गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे १५ लाख, आंबेडकर नगर (राजवाडा) रस्ता कॉक्रीटीकरण करणे १४ लाख, तिर्थक्षेत्र अंतर्गत देवस्थान परिसर सुशोभीकरण करणे १० लाख, खडकमाळेगांव ते टाकळी विंचूर ते रामा-०७ किमी ६१७.३८ लाख, मानोरी खु, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधणे २० लाख, मानोरी फाटा ते मानोरी खु रस्त्याची सुधारणा करणे ५० लाख मानोरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ (बॅच १) संशोधन व विकास अंतर्गत ग्रा मा ०१ ते मानोरी बू. रस्ता  लांबी ५.२४० किमी,  रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी १४ लाख या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे