
0
3
2
1
2
3
विंचूरला नायलॉन मांजामुळे तरुणाचा गळा चिरला
विंचूर : नायलॉन मांजा गळ्याला अडकल्याने गंभीर दुखापत होऊन तरुणाचा गळा चिरल्याने तब्बल 41 टाके पडले. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लासलगाव विंचूर रस्त्यावरील वेशी जवळ घटना घडली. बंदी असूनही नायलॉन मांजा वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बहिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या रेहान शेख (16) या तरुणाच्या गळयाला मांजा अडकल्याने गळा खोलवर चिरला गेला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया केल्याने त्याला आयुष्य मिळालं आहे.
दोन दिवसांपूर्वीच एक पक्षी मांजा अडकल्याने जखमी होऊन खाली कोसळला. येथील तरुणांनी त्याला पाणी पाजून अडकलेला मांजा काढून जीवदान दिले होते.
0
3
2
1
2
3