धार्मिकमहाराष्ट्रसामाजिक
बोलठाण येथे गजानन विजय पारायण सुरु

0
2
5
6
6
2
बोलठाणला श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व गजानन विजय पारायण सोहळ्यास सुरुवात
मुक्ताराम बागुल, नांदगाव –
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या बोलठाण येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व गजानन विजय पारायण सोहळ्यास दिनांक 19 फेब्रुवारी 2025 बुधवार पासून सुरुवात झाली असून सदर उत्साह तीन दिवस चालणार आहे. श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व गजानन विजय पारायण सोहळ्या निमित्ताने नेत्ररोग व मोतीबिंदू ऑपरेशन आणि तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे साधू संतांच्या आशीर्वादाने आणि बोलठाण ग्रामस्थांच्या व पंचक्रोशीतील भाविकांच्या अनमोल सहकार्याने श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व श्री गजानन विजय पारायण सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी केली जात असून या निमित्ताने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी नेत्ररोग व मोतीबिंदू ऑपरेशन व तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. याचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. बुधवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत ह.भ.प. श्री सागर महाराज कोचळे यांचे कीर्तन होणार आहे. श्री बाळासाहेब दौलतराव ढगे यांच्यातर्फे ही कीर्तन सेवा देण्यात येणार आहे. तर दुपारी दिनकर अण्णा बाबुराव बोरसे निपाणी व सचिन पाहुणे नानासाहेब कदम यांच्यातर्फे ग.भा. अलकाबाई प्रकाश हरबोले, स्वर्गीय प्रकाश बाबुराव हरबोले व रोशन हिम्मतराव पाटील शहीद जवान अमोल दादा हिम्मतराव पाटील स्मरणार्थ अन्नदान करण्यात येत आहे संध्याकाळी संतोष पप्पू कडू बापू निकम व चेतन हिरालालजी जैन यांच्यातर्फे अन्नदान करण्यात येत आहे. दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री सात ते नऊ वाजेच्या दरम्यान ह.भ.प. श्री आदिनाथ महाराज गिरकर यांचे कीर्तन होणार आहे. सदरची कीर्तन सेवा भावलाल रंगनाथ बारवकर यांच्या तर्फे देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी फुलहार व नारळ सेवा श्री नितीन शिवाजी माचे बोलठाण, हार्मोनियम श्री दिनकर बापू जठार आडगाव, श्री शेलार सर, श्री रामभाऊ वाघ यांच्यातर्फे सेवा देण्यात आली. सदरचा कार्यक्रम हा बोलठाण येथील नवेगाव माऊली मंदिर येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश हसवाल यांनी केले होते.
श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व गजानन विजय पारायण सोहळा हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी 2025 ते 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत तीन दिवस होत असून नागरिक याचा मोठ्या प्रमाणावर आस्वाद घेत आहेत.
0
2
5
6
6
2