
0
3
2
0
6
7
मुंगसरा- आजच्या अस्थिर कलीयुगात परमार्थ च जगाला सन्मार्गी व संस्कृती संस्कार संवर्धन करुन संसारातील सुख दुःखाने होरपळणाऱ्या मनाला विश्रांती देऊ शकतो, भाविक हा वारकरी होऊन वारी एकादशी व्रत करुन प्रपंच ही चांगला करतो, मला आपल्या मुंगसरे गावच्या दिंडीचा स्वाभिमान व आदर वाटतो, राजकीय दौरे कार्यक्रम धावपळीमुळे जरी सहभागी होता येत नसले तरी एक दिवस नक्कीच मी पुर्ण मुंगसरा ते काळाराम मंदिर पायी दिंडी वारी आपले सोबत नक्कीच करणार आहे.दिंडीला भव्य रथ पालखी व ज्या अडीअडचणी सोयी सुविधा कमी असतील तर त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करील, काहीही मदत लागली तर आपण केंव्हा ही कळवा, अर्थात मुंगसरा रामवारी एक आदर्श पायी दिंडी आहे, अशीच ती पुढे वाढत जावो,ती जबाबदारी सर्व आपली आहे, दिंडीला भेट देऊन खुप समाधान मिळाले असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री विष्णुपंत म्हैसधुने यांनी नाशिक येथे दिंडीचे स्वागत व सत्कार प्रसंगी काढले, यावेळी श्री राजाराम पडोळ, पो.पाटील हभपश्री बबनराव म्हैसधुने,हभप रावसाहेब लोणारे, हभप एकनाथ भोर,हभप हिरामण म्हैसधुणे, हभप वामन म्हैसधुने,हभप भिमराव म्हैसधुने,हभप नवनाथ म्हैसधुने,हभप रुजा म्हैसनुने,हभप महादु भोर,हभप किसन वायचळे,हभप बहिरु गोधडे,हभप किसन भोर,हभपसौ मंगला भोर,हभप संगिता कोरडे,गीताबाई घोरपडे, हभपवंदना म्हैसधुने,हभप मंजुळा भोर आदी महिला पुरुष वारकरी दिंडीत पन्नास सहभागी झाले होते
0
3
2
0
6
7