आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक
विंचूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

0
3
2
0
5
3
विंचूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
आज दिनांक 5 जून वार 2025 रोजी वार गुरुवार रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम नाशिक वन विभागाचे अधिकारी गांगुर्डे आणि कल्पना पाईकराव मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नाशिक वन विभागाचे अधिकारी गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि झाडे लावण्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचे महत्त्व समजावून सांगितले त्यानंतर विद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उंबर, वड, सीताफळ या झाडांचे वृक्ष रोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री माळी सर हरित सेना प्रमुख बोरसे एन बी काळे जे.व्ही सर्व इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
0
3
2
0
5
3