0
4
2
9
5
7
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लासलगाव, विंचूर येथे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते वृक्षारोपण
जिल्हा परिषद शाळा विंचूर व लासलगाव उपजिल्हा रुग्णालय लासलगाव येथे फळवाटप
लासलगाव,दि.२५ जुलै:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात जनविश्वास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विंचूर जिल्हा परिषद शाळा व लासलगाव उपजिल्हा रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थी व लासालाव उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे देखील वाटप करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉ.श्रीकांत आवारे, दत्ताकाका रायते, कैलास सोनवणे,महिला अध्यक्षा सुरेखा नागरे, बालेश जाधव, अशोक नागरे, मंगेश गवळी, पांडुरंग राऊत, विलास गोरे, बबन शिंदे, जयंत साळी, राहुल डुंबरे, सोहेल मोमीन, शांताराम नागरे, इस्माईल मोमीन, मोहसीन शेख, महेंद्र पुंड, संतोष राजोळे, सुनील नेवगे, भाऊसाहेब गांगुर्डे, शंकरलाल सोनी, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, अनिल विंचूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

0
4
2
9
5
7



