
0
4
2
9
5
7
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक आणि धुळे जिल्हा पोलीस यांच्याकडून जामन्यापाणी (ता. शिरपूर) परिसरातील अतिदुर्गम वनक्षेत्रात अवैध गांजासदृश्य लागवड झालेली शेती उध्वस्त करण्यात आली. सलग दोन दिवस चाललेल्या या संयुक्त मोहिमेत एकूण दोन हजार ५० किलो गांजा सदृश्य झाडे जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी दोन लाख ५० हजार रुपये आहे.
बुधवारी (दि.२६) सायंकाळी ही घटना उघडकीस आली.अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे (कृती विभाग नाशिक) पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत अमली पदार्थ सदृश्य वनस्पतीची लागवड झाल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची गुप्त पद्धतीने शिरपूर तालुक्यातील जामन्यापाणी परिसरात खात्री करण्यात आली. यावेळी वनजमिनीवर मोठ्या प्रमाणावर गांजासदृश्य झाडांची अवैध लागवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या झाडांपासून तयार होणारे पदार्थ मानवी मेंदुवर घातक परिणाम करतात, हे लक्षात आल्यावर तातडीने संयुक्त कारवाईची योजना आखण्यात आली होती.
यानंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक आणि धुळे जिल्हा पोलीस यांनी या भागात संयुक्तपणे छापे घातले. कारवाईदरम्यान सात संशयित व्यक्ती अवैध लागवडीच्या ठिकाणीच झाडांची देखभाल करताना आढळले. त्यामध्ये कालुसिंग गोंडा पावरा, कृष्णा तारासिंग पावरा, हरबा कुवरसिंग पावरा, गोंडा नाना पावरा, गुलाब हाण्या पावरा, कांतीलाल गुलाब पावरा आणि रमेश गुलाब पावरा यांचा समावेश आहे. यापैकी काही आरोपी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील असून काही शिरपूर तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस अधीक्षक मकानदार, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही संयुक्त मोहीम राबवली. या मोहिमेत पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे व माधवानंद धोतरे यांच्यासह संजय आदलिंग, गणेश ढामले, राधेश्याम पवार, प्रशांत देशमुख, वैभव पांढरे, भास्कर चव्हाण, दिनेश शिंदे, चेतन चव्हाण, स्वप्निल वारडे, किशोर बर्गे, अर्जन बंद्रे, अनिल पास्ते, गणेश मिसाळ व कालिचरन बिऱ्हाडे यांचा या पथकात समावेश होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या अधीपत्याखालील पथक पुढील तपास करीत आहे.
0
4
2
9
5
7